आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न घराचे:घर खरेदी दुपटीने वाढली, कोविडपूर्व पातळीपेक्षा जास्त; कन्सल्टंट एनारॉकच्या जुलै-सप्टेंबर 2021 मधील तिमाही अहवालात दावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वस्त कर्ज, नोकऱ्या वाढल्याचा परिणाम

स्वस्त गृहकर्ज आणि आयटी व त्याच्याशी संबंधित सेवा क्षेत्रात नोकऱ्या वाढल्याचा सकारात्मक परिणाम गृहखरेदीवर दिसू लागला आहे. यंदा जुलै ते सप्टेंबर तिमाहीत देशातील ७ प्रमुख शहरांत घर खरेदीत दुप्पट वाढ होत ६२,८०० घरांची विक्री झाली आहे. खुशखबर म्हणजे, ही विक्री काेविडपूर्व पातळीपेक्षाही जास्त झाली आहे.

प्रॉपर्टी कन्सल्टंट एनारॉकच्या ताज्या अहवालानुसार, ७ प्रमुख शहरांत २०२० च्या समान तिमाहीत २९,५२० युनिट्सची खरेदी झाली. कोरोनाकाळापूर्वी म्हणजे जुलै-सप्टेंबर २०१९ मध्ये ५५,०८० व २०१८ च्या समान तिमाहीत ५२,१३० युनिट्सची िवक्री झाली होती. एप्रिल-जून २०२१च्या तिमाहीत २४,५६० घरांची खरेदी झाली होती.

२०२१ मध्ये ३०% उसळीचा अंदाज
यापूर्वी एनारॉकने ७ शहरांत वार्षिक आधारे ३०% उसळीसह १,७९,५२७ घरांच्या विक्रीचा अंदाज व्यक्त केला होता. गतवर्षी २०२० मध्ये १,३८,३४४ घरांची विक्री झाली होती. २०१९ मध्ये ७ प्रमुख शहरांत २,६१,३५८ घरांची विक्री झाली होती.

नाइट फ्रँकचा दावा : २०२२ मध्ये रिअल इस्टेटमध्ये २.५ अब्ज डॉलर्स गंतवणूक
नाइट फ्रँकने ताज्या अहवालात दावा केला की, भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात २०२२ मध्ये परकीय गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचू शकते. हा आकडा १८,५०० कोटी रुपयांवर (२.५ अब्ज डॉलर्स) जाऊ शकतो. अमेरिका, यूके, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड हे देश गंुतवणूक करतील.

यामुळे मागणी... नोकरी, स्वत:चे घर

  • आयटी व त्याशी संबंधित सेवा क्षेत्रात वृद्धीमुळे हाऊसिंग मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
  • नोकरीची सुरक्षितता व गृहकर्जाच्या विक्रमी नीचांकी दरांमुळे घरांची मागणी वाढली आहे.
  • स्वत:चे घर घेण्याची भावना वाढीस लागली आहे.
  • वर्क फ्रॉम होमच्या वाढत्या ट्रेंडमुळे लोकांची मोठे फ्लॅट वा मोठी घरे खरेदी करण्यास पसंती.
  • लसीकरणामुळे ग्राहक घरे पाहण्यास जात आहेत.

दरम्यान.... घरांच्या किमतीही ३% वाढल्या
अहवालानुसार, घरांच्या किमतीही ३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत घरांच्या किमती ५,७६० रुपये चाैरस फुटांपर्यंत गेल्या. त्या गतवर्षाच्या समान तिमाहीत ५,६०० रुपये चाैरस फुटच होत्या. म्हणजे सुमारे ३% महाग.

बातम्या आणखी आहेत...