आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया महिन्यात सुरू झालेल्या वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये घरांची विक्री २५-३०% वाढणे आणि सर्वात जास्त नवीन प्रकल्पांच्या शुभारंभाची शक्यता आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जाणकारांनुसार, घर-सदनिकेची विक्री व्यावसायिक आणि भाडेतत्त्वावरील मालमत्तेच्या तुलनेत जास्त वेगाने वाढेल. अनेक राज्यांत मुद्रांक शुल्क किंवा सर्कल रेट घटणे आणि गृह कर्ज स्वस्त होण्यासारख्या बाबी स्थावर मालमत्ता क्षेत्राला सपोर्ट करत आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे(क्रेडाई) चेअरमन जक्षय शहा यांनी सांगितले की, घर किंवा फ्लॅटचे भाव सध्या वास्तविक पातळीवर आहेत. बिल्डरही घराचा हप्ता घेत नाहीत आणि व्याजदरही सर्वात नीचांकी पातळीवर आहेत. एकूण काय तर इको सिस्टिम रिअल इस्टेटच्या बाजूने आहे. अशा स्थितीत मला वाटते की, २०२१-२२ मध्ये कमीत कमी २५-३०% वृद्धी कायम राहील. जून-जुलैमध्ये जेव्हा देशाच्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण होईल, त्यानंतर कमर्शियल स्पेसमध्येही तेजीची अपेक्षा आहे. मोठ्या शहरांत १५०-२०० किमी क्षेत्रात वेगवान रिअल इस्टेट विकास पाहायला मिळेल.
मुंबई | मुंबईत बांधकाम व रिअल इस्टेट व्यवसाय जवळपास रुळावर परतला आहे. येथे सदनिकांची विक्री जानेवारीत ६९% आणि फेब्रुवारीत ७१.६२% वाढली आहे. २४ मार्चपर्यंत १२,४०० सदनिकांची विक्री झाली आहे. नारडेकोच्या(महाराष्ट्र) वरिष्ठ उपाध्यक्ष मंजू याज्ञिक यांच्यानुसार, जाने. २१ मध्ये १०,४११ सदनिका विकल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये ५,९२७ सदनिका-घरे विकली होती. या फेब्रुवारीत १०,१७२ घरे विकली.
या राज्यांनी उचलली विशेष पावले
महाराष्ट्र| अॅडिशनल एफएसआय प्रीमियमवर ग्राहकांना ५०% सूट.
महिलांच्या नावावर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १% अतिरिक्त कपात.
पाठबळ मिळणारे घटक
जून-जुलैमध्ये वाढेल मागणी
सध्या पूर्ण इको सिस्टिम पूर्ण रिअल इस्टेटच्या बाजूने आहे. जून-जुलैमध्ये देशातील मोठ्या लोकसंख्येला लसीकरण झाल्यानंतर मालमत्ता बाजारात मागणी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. - जक्ष्य शाह, चेअरमन, क्रेडाई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.