आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Hot Personality Isha Ambani : Mother Of Twins, Isha Herself Had A Tomboy Style Childhood.

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - ईशा अंबानी:जुळ्यांची आई ईशा स्वतःच जुळे अपत्य, बालपणी टॉमबॉय स्टाइलमध्ये राहायची

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशा स्वतः मुकेश अंबानी यांचे जुळे अपत्य आहे. आकाश अंबानी तिचा जुळा भाऊ आहे.

जन्म : २३ आॅक्टोबर १९९१, मुंबई शिक्षण : एमबीए, स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस, अमेरिका कुटुंब : पती आनंद पिरॅमल, दोन मुले, मुलगी-आदिया आणि मुलगा-कृष्णा

सुमारे ४.५० लाख कोटी रुपयांच्या रिलायन्स रिटेलच्या संचालिका आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने नुकताच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे ईशा स्वतः मुकेश आणि नीता यांचे जुळे अपत्य आहे. ईशा आणि तिचे पती आनंद पिरॅमल यांनी त्यांच्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवले आहे. ईशा पिरॅमल ग्रुपच्या अजय आणि स्वाती पिरॅमल यांची सून आहे. २०१८ मध्ये तिने आनंद पिरॅमलशी लग्न केले होते. मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये ईशाची रिलायन्स रिटेलची संचालक म्हणून घोषणा केली. ३१ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या रिलायन्स रिटेलच्या अहवालानुसार, ईशाच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलचे सुमारे ७००० शहरांमध्ये १५,१९६ स्टोअर्स आहेत. ते ४.१६ कोटी स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहेत. यामध्ये रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट, जिओ मार्ट, रिलायन्स ट्रेंड, एजिओ इत्यादींचा समावेश आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलचे उत्पन्न सुमारे १.९९ लाख कोटी रुपये होते. अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या मते, जुळ्या स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता ६० पैकी एक असते, तर पुरुषाने जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता १२५ पैकी एक असते.

करिअर : रिलायन्स रिटेलची संचालक, जिओ व एजिओ अॅपची कल्पनाही तिचीच स्टॅनफोर्डमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर ईशा कौटुंबिक व्यवसायात सामील झाली. २०१४ मध्ये वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिला रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या बोर्डात स्थान देण्यात आले. दोन वर्षांनंतर ईशाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये एजिओ फॅशन ऑनलाइन ब्रँड लाँच केला. मुकेश अंबानींच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स जिओ लाँच करण्याची कल्पनाही ईशाचीच होती. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या एमएम स्टाइल या ब्रँडमध्ये तिची ४०% भागीदारी आहे.

प्रारंभिक जीवन : शाळेत असताना फुटबॉल आवडता खेळ एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ईशा अंबानीने सांगितले की, ती लहानपणी टॉमबॉय स्टाइलमध्ये राहायची. शाळेत फुटबॉल हा तिचा आवडता खेळ होता. तिचे सुरुवातीचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, मुंबई येथे झाले. यानंतर तिने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या येल विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे ईशाने मानसशास्त्रात पदवी मिळवली. यानंतर तिने स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१४ मध्ये तिने अमेरिकेच्या मॅकेन्झी अँड कंपनी या मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्ममध्ये काही काळ व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले. ईशा प्रशिक्षित पियानो वादक आहे. एका मासिकाशी बोलताना ईशाने सांगितले की, सुरुवातीला तिला शाळेत शिक्षिका व्हायचे होते. यामुळेच आजही ती गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खूप काम आणि दानधर्म करते.

रंजक : अमेरिकेच्या नॅशनल म्युझियमची ईशा अंबानी ट्रस्टी {ईशा अमेरिकेतील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टमध्ये ट्रस्टी आहे. १७ सदस्यीय मंडळाच्या इतर सदस्यांमध्ये युनायटेड स्टेट्सचे सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती, अमेरिकन सिनेटचे सदस्य यांचा समावेश आहे. {अलीकडेच फेसबुकने रिलायन्सचे ९.९९ % शेअर्स ४५,००० कोटी रु.ना विकत घेतले. या महत्त्वाच्या करारात ईशा अंबानीची महत्त्वाची भूमिका होती. {रिलायन्स फाउंडेशनच्या डिजिटल शिक्षण कार्यक्रमाचे श्रेयही मुकेश ईशाला देतात. { वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिचे नाव फोर्ब्जच्या टॉप-१० अब्जाधीश वारसांच्या यादीत होते. {तिच्या सासूबाई स्वाती पिरॅमल शास्त्रज्ञ आणि उद्योगपती आहेत. { आकाश अंबानीने बहीण ईशाच्या लग्नासाठी स्वतःचे लग्न वर्षभर पुढे ढकलले होते. {२०२० मध्ये ईशाचा फॉर्च्युनच्या ४० अंडर ४० श्रेणीतील जगातील उदयोन्मुख नेत्यांत समावेश करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...