आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या काळात सर्वाधिक प्रभावित झालेल्या उद्योगांपैकी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीही अखेर कोरोनाच्या प्रभावातून सावरली आहे. प्रवासी निर्बंध उठवल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू केल्यानंतर, उद्योगाच्या क्रियाकलापांना बरीच गती दिसून येत आहे. यामुळे साथीच्या आजाराच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच हॉटेल्सची ऑक्युपन्सी ६५ टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
हाॅस्पिटॅलिटी क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या एचव्हीएस अॅनाराॅकचे अध्यक्ष (दक्षिण आशिया) मनदीप एस. लांबा यांच्या मते, देशात प्रवासाबाबत सकारात्मक भावना आहे. हॉटेल ऑक्युपन्सी आणि प्रतिरूम उत्पन्नाने अनेक शहरांमध्ये कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे. अलीकडे, आयपीएलमुळे मुंबईतील हॉटेल्सची ऑक्युपन्सी ८०% पेक्षा जास्त होती. हॉटेल भाड्यातही वार्षिक आधारावर ६०-६२% वाढ झाली आहे. कोविडपूर्व म्हणजेच २०१९ च्या तुलनेत भाडेदेखील २% वरून ४% पर्यंत वाढले आहे. हॉटेल्सचे प्रतिरूमचे उत्पन्नही वार्षिक आधारावर तिप्पट झाले आहे.
हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष के.बी. काचरू म्हणाले, देशांतर्गत पर्यटन, कॉर्पोरेट मागणी आणि हॉटेल्समधून लग्नाचा कल वाढल्यामुळे भारताच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राने कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांच्या संख्येनेही कोविडपूर्व पातळी जवळजवळ ओलांडली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात चांगली वाढ दिसून येत आहे. जयपूर, वडोदरा, कोची यांसारख्या देशातील टायर २ आणि ३ शहरांमध्ये हॉटेल चेनदेखील विस्तारत आहेत.
हॉस्पिटॅलिटी उद्योगाला मिळतेय गती, ऑक्युपन्सी आणि भाड्यात वाढ
वर्तमान स्थिती मासिक वाढ वार्षिक वाढ पूर्वकोविडपासून वाढ दररोजचे सरासरी भाडे ५,७५०-५,९५० ६-८% ६०%-६२% २-४% ऑक्युपन्सी 64%-66% 3-5 पीपी 35-37 पीपी - प्रति उपलब्ध खोली महसूल 3,680-3,927 13-15% 262%-264% 1-3%
टीप: पीपी = पर्सेंट पॉइंट स्रोत: एचवीएस एनारॉक
या शहरांमध्ये हॉटेल्सच्या भाड्यात वार्षिक आधारावर सर्वाधिक वाढ
शहर भाडेवाढ
मुंबई 105% पेक्षा जास्त
दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू 70 ते 105%
पुणे, गोवा, चेन्नई, कोची 35 ते 70%
चंदीगड, कोलकाता 35% पेक्षा कमी
व्यवसाय वाढला, नोकऱ्या वाढल्या
कोरोनाच्या काळात ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या गेल्या. आता व्यवसायाच्या वाढीसह या क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी सर्वाधिक आहे. जॉब-स्पीकच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, या क्षेत्रातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत वार्षिक आधारावर १६९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामध्येही निम्म्याहून अधिक नोकऱ्या नवीन उमेदवारांसाठी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.