आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजानेवारी मार्च तिमाहीत देशाच्या ७ मोठ्या शहरात ६२,००० घरांची विक्री झाली. २०२२ च्या समान तिमाहीत विक्री झालेल्या घरांपेक्षा २० टक्के जास्त आहे. देशात घरांची विक्री अशावेळी वाढली, जेव्हा रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज महाग झाले दरम्यान घरांच्या किमती ४-१२ टक्के वाढल्या. चांगली सुवधा आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर असलेले मोठे प्रीमियमच्या घरांची मागणी सलग वाढत आहे. रिअल इस्टेट सेवा कंपनी जेएलएलच्या अहवालानुसार, देशातील अग्रगण्य गृहनिर्माण बाजारपेठेतील एकूण न विकल्या गेलेल्या घरांमध्ये १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांचा हिस्सा २२% पर्यंत वाढला. २०२२ च्या मार्च तिमाहीत हा आकडा १८% होता.
एकट्या बंगळुरू शहरात सर्वाधिक घरांची झाली विक्री { घरांच्या विक्रीत २१%चा भागीदारीसह बंगळुरू टॉपवर राहिले, मुंबई (२०.९%) दुसरे आणि पुणे (१९.४%) तिसऱ्या क्रमांकावर राहिले. { सात मोठ्या शहरात घरांच्या एकूण विक्रीत ६१% हिस्सा बंगळुरु, मुंबई, पुण्याच्या {मार्च तिमाहीत ७,८०० प्लॉट्स व बंगल्यांची विक्री झाली. {जानेवारी-मार्चमध्ये ७५,००० घरे लाँच करण्यात आली, २०१२ मध्ये ८२,७५७ घरे लाँच झाल्यापासून हा उच्चांक आहे.
मागणी वाढण्याचे संकेत ^आरबीआयद्वारे रेपो रेटमध्ये २.५% वाढ करूनही २०२३च्या पहिल्या तिमाहीत रहिवाशी क्षेत्राने चांगली वाढ केली. घरांच्या किमती वाढण्याचा हा संकेत आहे. - सामंतक दास, मुख्य अर्थतज्ञ, इंडिया, जेएलएल
५० ते ७५ लाखांच्या घरांची सर्वाधिक विक्री एकूण विक्रीत परवडणारे विभाग म्हणजेच ५० लाख रुपयापेक्षा कमी भावाच्या घरांचा वाटा २२% वरुन घटून १८% राहिला. मध्य विभागातील घरांचा हिस्सा म्हणजे ५०-७५ लाख सुमारे २५% होता. मुंबई, दिल्ली, बंगलोर, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता ही टॉप ७ निवासी बाजारपेठ आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.