आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे पॅन कार्ड हरवले, अजिबात चिंता करू नका:घरबसल्या काढू शकता पॅन कार्ड; जाणून घ्या- ई- पॅन कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

आधार कार्डप्रमाणे पॅन कार्ड देखील अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. ज्याला फोटो आयडी प्रुफ म्हणून वापरला जातो. बँकेत खाते उघडण्यापासून ते अन्य विविध कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते.

अशातच जर तुमचे पॅन कार्ड गहाळ झाले तर तुम्ही अडचणीत येवू शकता, अशावेळी तुम्ही पॅन कार्ड कसे मिळविणार? आता काय करावे, असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण चिंता करू नका. तुम्हाला ऑनलाईन ई-पॅन काढता येणार आहे, ते म्हणजे घरबसल्या देखील.

एकापेक्षा जास्त कार्ढ असेल तर 10 हजारांचा दंड

 • ई-पॅन कार्ड हे फिजिकल पॅन कार्ड म्हणून म्हणून प्रामुख्याने काम करते. सर्व फिजीकल व्यवहार आणि जेथे पॅन दाखवणे अनिवार्य आहे अशा ठिकाणी वापरता येते. ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे आणि आधारशी लिंक केलेला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक आहे. ते आता ई-पॅनचा लाभ घेऊ शकतात.
 • दरम्यान ज्यांच्याकडे फिजिकल पॅन कार्ड नाही तेच लोक ई-पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. इनकम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 272B च्या तरतुदीनुसार, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास दहा हजारांचा दंड आकारला जाईल, असे म्हटले आहे.

पॅन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

 • जर तुम्हाला ई-पॅन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला प्रथम NSDL च्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
 • यासाठी तुम्ही https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर क्लिक करू शकता.
 • होमपेजवर Apply for PAN वर क्लिक करा, त्यात आवश्यक डिटेल्स एंटर करा. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्सवर टिक करा आणि कॅप्चा सबमिट करा.
 • आता तुमच्या पॅनच्या सर्व आवश्यक डिटेल्स व्हेरिफाय करा. ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसतील.
 • आता पॅन व्हेरिफिकेशनसाठी कोणत्याही एका मोडवर क्लिक करा. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्सवर टिक करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा.
 • ओटीपी व्हेरिफाय करा आणि 'Continue With Paid' ई-पॅन डाउनलोड फॅसिलिटी वर क्लिक करा.
 • आता कोणताही एक पेमेंट गेटवे निवडा आणि पेमेंट कन्फर्म करण्यासाठी ऑप्शनवर क्लिक करा.
 • प्रोसेसींग फी म्हणून 9 रुपये भरा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर 'Continue' ऑप्शनवर क्लिक करा.
 • पेमेंट रिसिप्ट तयार झाल्यानंतर, डाउनलोड ई-पॅन वर क्लिक करा.
 • तुमचे ई-पॅन कार्ड तुमच्या मोबाईल फोन किंवा पीसीमध्ये डाउनलोड केले जाईल.

यासंदर्भातील अन्य बातम्या देखील वाचा

अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी हेही वाचा..

रेंट अ‍ॅग्रीमेंट 11 महिन्यांचे का असते: जाणून घ्या- भाडे करारनामा करण्याची प्रक्रिया

जेव्हा आपण घर भाड्याने घेतो, तेव्हा आपल्याला भाडे करारनामा (Rent Agreement) करावा लागतो. मात्र, तुम्हाला भाडे करारनामा बद्दलची ही महत्त्वाची बाब माहित आहे का, तो म्हणजे रेंट अ‍ॅग्रीमेंट केवळ 11 महिन्यांचेच का असते, अर्थात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मुळात 12 महिन्यांचे एक वर्ष असते, मग करार अकरा महिन्यांचा का केला जातो. केवळ 11 महिन्यांचे अ‍ॅग्रीमेंट मालक आणि भाडेकरूला का बंधनकारक असते. परंतू यामागे नेमकं नक्की काय कारण असते, याबाबत येथे वाचा संपूर्ण बातमी...

NPS खाते काय असते, कशी बचत करणार:वाचा- राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बचतीचे फायदे

सेवानिवृत्ती नंतरच्या आर्थिक समस्या उद्भवू नये म्हणून बहुतांश लोक नोकरीत असताना आर्थिक नियोजन सुरू करतात. यासाठी ते एफडी, आरडी, म्युच्युअल फंडासारखे पर्याय निवडतात. भारतात शासकीय नोकरदारांना पेन्शनचा लाभ मिळतो. पण खासगी नोकरदार वर्गाला पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खासगी नोकरदार बचत, गुंतवणुकीवर भर देत आर्थिक बाजू पक्की करण्याचा प्रयत्न करतात. येथे वाचा संपूर्ण बातमी

नोकरी सोडली आता ग्रॅच्युइटीची रक्कम हवी:जाणून घ्या - ग्रॅच्युइटीची रक्कम मिळविण्याची प्रक्रिया

शासकीय नोकरी असो किंवा खासगी कंपनीतील कर्मचारी त्यांना ग्रॅच्युइटीच्या कायद्यातंर्गत ठराविक कालावधीपर्यंत एकाच संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम केल्यावर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळतो. जेव्हा एखादा कर्मचारी सलग 5 वर्षं एखाद्या कंपनीसोबत काम करतो, तेव्हा त्याला ग्रॅच्युइटीच्या ठरलेल्या नियमानुसार त्याची रक्कम दिली जाते. एखादा कर्मचारी निवृत्त होत असेल किंवा त्याने नोकरीचा राजीनामा दिला, तरीही त्याला ग्रॅच्युइटी दिली जाते. येथे वाचा संपूर्ण बातमी

नोट फाटली, रंग लागला तर चिंतेत पडू नका : काय सांगतो RBIचा नियम

आपल्या खिशात असलेल्या नोटांवरून आपल्या मनात अनेक विचार कायम येत असतात. खास करून कोणाकडूनही नोट घेताना आपण नोट फाटकी तर नाही ना, त्यावर काही लिहलेले नाही ना, याची पूर्ण खात्री करून स्वीकारतो. तर आपल्याकडे असलेली अशी फाटकी नोट देखील अनेक दुकानदार घेत नाहीत. चांगली नोट द्या, अशी मागणी दुकानदार देखील आपल्याकडे करतो. अर्थात यात काहीच चूकीचे नाही. मग फाटलेल्या नोटांचे करायचे काय, याबाबत वाचा ही संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...