आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रेडिट स्कोअर जो सर्वांना सिबील (CIBIL) स्कोर नावाने जास्त परिचीत आहे. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी हा सिबील स्कोर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 700 च्या वर सिबील स्कोअर सामान्यतः चांगला मानला जातो. तुमचा स्कोअर जितका जास्त असेल तितका तुमचाय कर्जाचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बहुतांश बँका आणि तुमचा क्रेडिट स्कोअर अहवाल NBBC कडून मिळवतात.
सिबील स्कोअर कमी असल्यास, अर्ज देखील रद्द केला जाऊ शकतो. परंतु, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी/खराब असल्यास आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी कर्ज हवे असल्यास? किंवा तुम्ही नवीन ग्राहक असाल आणि तुमच्याकडे क्रेडिट स्कोअर नसेल तर? मग कर्ज कसे मिळणार? येथे आम्ही काही मार्गांची सूची देत आहोत ज्याद्वारे तुम्ही कमी क्रेडिट स्कोअर असतानाही कर्ज घेण्याचा प्रयत्न करू शकता :
NBFC किंवा Fintech कडे अर्ज करू करा
तुमचा सिबील स्कोअर कमी असल्यास, तुम्ही NBFC किंवा Fintech सावकारांना (लेंडर्स) कर्जासाठी अर्ज करू शकता. NBFCs आणि Fintechs देखील कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राह्कांना कर्ज देतात. तथापि, त्यांचे व्याजदर सामान्यतः बँकांच्या व्याजदरांपेक्षा बरेच जास्त असतात. हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की, जर तुम्ही बँकेकडे अर्ज केला आणि अर्ज नाकारला गेला. तर ते सिबील स्कोअर आणखी कमी करू होऊ शकतो.
सह-अर्जदारासह कर्जासाठी अर्ज करा
जर CIBIL स्कोअर कमी असेल तर तुम्ही सह-अर्जदारासह अर्ज करू शकता. एक सह-अर्जदार कुटुंबातील सदस्य असू शकतो. ज्याचा क्रेडिट इतिहास आणि कमाई चांगली आहे. सह-अर्जदार जोडल्याने सावकाराची पत जोखीम कमी होते. कारण कर्जाच्या परतफेडीसाठी सह-अर्जदारही तितकाच जबाबदार असतो. तुम्ही चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीला हमीदार देखील बनवू शकता.
लहान किंवा सुरक्षित कर्जाची निवड करा
तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास छोट्या कर्जासाठी अर्ज करा. लहान कर्ज घेणे आणि त्याची परतफेड तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत करण्यास मदत करेल. एकदा तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत झाला की, तुम्ही कोणत्याही बँकेत मोठ्या कर्जासाठी अर्ज करू शकता. काही बँका आणि वित्तीय संस्था कमी क्रेडिट स्कोअर धारकांना सुरक्षित कर्ज देतात. सुरक्षित कर्जामध्ये सुवर्ण कर्ज, मालमत्तेवर कर्ज किंवा रोख्यांवर कर्ज समाविष्ट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.