आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. मात्र, सध्याच्या नोटा अवैध ठरणार नाहीत. आरबीआयने सध्या 2000 च्या नोटा बँकांमध्ये बदलण्यास किंवा 30 सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. परंतु त्यानंतरही त्या कायदेशीर राहतील असेही सांगितले आहे. आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की या 2 हजाराच्या नोटा कशा बदलता येतील? येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर तुमच्याकडे 2 हजाराच्या नोटा असतील तर त्या बदलण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल.
प्रश्न : या 2 हजाराच्या नोटा कुठे बदलता येतील?
तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही या नोटा बदलू शकता. यासाठी कोणत्याही विशिष्ट बँकांची निवड केलेली नाही. हे काम तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन करू शकता. सरकारच्या म्हणण्यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत 2 हजाराच्या 181 कोटी नोटा चलनात होत्या.
प्रश्न: माझे बँक खाते नाही, त्यामुळे मी बँक खात्याशिवाय नोटा बदलून घेऊ शकतो का?
उत्तर: होय, तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता. यासाठी तुमचे बँक खाते असणे गरजेचे नाही. तिथे जाऊन स्लिप भरावी लागेल. या स्लिपमध्ये, तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, ओळखपत्र तपशील (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगा कार्ड आणि लोकसंख्या रजिस्टर) आणि तुमच्या नोट्सचे तपशील भरावे लागतील.
ही सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला त्यावर स्वाक्षरी करावी लागेल आणि ती नोटेसह बँकेच्या काउंटरवर जमा करावी लागेल. यानंतर तुमच्या नोटा बदलल्या जातील. दुसरीकडे, जर तुमचे त्या बँकेत खाते असेल, तर तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँक डिपॉझिट स्लिप भरावी लागेल.
प्रश्न: एकाच वेळी किती नोटा बदलल्या जाऊ शकतात?
उत्तरः 2 हजाराची नोट एका वेळी ₹ 20,000/- च्या मर्यादेपर्यंत इतर मूल्यांमध्ये बदलल्या जाऊ शकतात. दुसरीकडे, तुमचे खाते असल्यास, तुम्ही कितीही 2000 च्या नोटा जमा करू शकता.
प्रश्न: नोटा बदलून घेण्यासाठी मला बँकेत पैसे द्यावे लागतील का?
उत्तर: नाही, तुमच्याकडून मनी एक्सचेंजसाठी शुल्क आकारले जाणार नाही. हे अगदी फ्री मध्ये आहे. यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही बँक अधिकारी किंवा बँकिंग लोकपाल यांच्याकडे तक्रार करू शकता.
प्रश्नः 30 सप्टेंबरपर्यंत नोटा जमा न केल्यास काय होईल?
उत्तर: ₹ 2000 च्या नोटा व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात आणि पेमेंट म्हणून देखील प्राप्त केल्या जाऊ शकतात. तथापि, RBI ने 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या बँक नोटा जमा करण्याचा किंवा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.
प्रश्न : हा नवा नियम कोणाला लागू आहे?
उत्तर : हा निर्णय सर्वांना लागू आहे. 2000 च्या नोटा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने बँकेच्या कोणत्याही शाखेत त्या जमा कराव्या लागतील किंवा 30 सप्टेंबरपर्यंत त्या इतर नोटांसाठी बदलून घ्याव्या लागतील.
हे ही वाचा
गुलाबी नोटवाल्यांनो, आता लावा रांगा !:2000 ची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा; 23 मेपासून 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येणार
8 नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीच्या साडेसहा वर्षांनंतर पुन्हा नाेटबंदी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नसल्याची घोषणा केली. मात्र, त्या तातडीने बंद केल्या नाहीत. बँकेने म्हटले की २००० च्या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात राहतील. बाजारात उपलब्ध नोटा एक तर बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बँकेतून बदलून घेता येतील. या नोटांची देवाणघेवाण किंवा त्याद्वारे खरेदी सुरू राहील. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.