आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर तुमचे ट्विटर खाते सस्पेंड झाले असेल तर तुम्ही काळजी करू नका. तुम्ही खाते पुनर्संचयित अर्थात रिस्टोअर करण्यासाठी अपील करू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीने स्टेप फॉलो करायच्या आहेत. अवघ्या 5 मिनिटांत तुम्ही खाते रिस्टोअर करू शकता. चला तर जाणून घेऊया त्याची प्रक्रिया.
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर खाती निलंबित करणे आता सामान्य बाब झालेली आहे. ट्विटरने दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघण केल्याने दररोज हजारो लोकांची ट्विटर खाते सस्पेंड केली जातात. जर यात तुमचेही खाते निलंबित झाले, तर अजिबात चिंता करू नका. एलन मस्क यांनी ट्विटरचा कारभार हाती घेतल्यानंतर सर्व युजर्सना खाते पुनर्संचयित करण्याची सोपी पद्धत दिली आहे.
या धोरणांतर्गत, ट्विटर अशी सामग्री हटवण्यासाठी प्रथम तुम्हाला (ट्विटर खाते पुनर्संचयित फॉर्म) संदेश पाठवेल. जर तुम्ही असा प्रक्षोभक मजकूर हटवला नाही तर तुमचे खाते कायमचे निलंबित केले जाईल. दुसरीकडे, तुम्ही पोस्ट हटवल्यास, तुम्हाला निलंबनापासून वाचवले जाईल. खाते निलंबनाच्या बाबतीत, तुम्ही खाली दिलेल्या सोप्या पायऱ्यांद्वारे पुनर्संचयित करण्यासाठी अपील करू शकता. तसेच अशा प्रकारे तुम्ही तुमचे खाते रिस्टोअर करू शकता.
जाणून घ्या- खालील स्टेप प्रमाणे करू शकता अकाऊंट रिस्टोअर
वरिल स्टेप करूनही खाते रिस्टोअर झाले नाही तर....
वरील स्टेपचे पालन करून देखील तुमचे ट्विटर अकाउंट री-स्टोअर झाले नाही, तर तुम्ही दुसऱ्या अकाउंटवरून ट्विटरला तुमच्या खात्यासोबत टॅग करून रि-स्टोअर करण्यासाठी विनंती करू शकता. परंतु लक्षात ठेवा की खाते सक्रिय होताच, बेकायदेशीर किंवा भडकाऊ पोस्ट त्वरित हटवाव्या लागतील.
कशामुळे ट्विटर खाते सस्पेंड होते
हे ही वाचा
डोमिसाईल प्रमाणपत्र कसे काढणार:जाणून घ्या- ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
हे ही वाचा सविस्तर
ट्विटर ब्लू सेवा :सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांना निळा मार्क मिळेल, HD व्हिडिओ अपलोड करता येईल
ट्विटरने आपली ब्लू सेवा पुन्हा लॉंच करणार आहे. ट्विटरच्या अधिकृत हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे. या सबस्क्रिप्शन सेवेमध्ये सरकार, कंपन्या आणि सामान्य लोकांना वेगवेगळ्या रंगाचे बॅज मिळतील. कंपन्यांना गोल्डन रंगाचा, सरकारी खात्यांना ग्रे तर सामान्यांना ब्लू टिक्स दिले जाणार आहे. सबस्क्रिप्शन मिळण्यापूर्वी सर्व चेक मॅन्युअली तपासले जाणार आहेत - येथे वाचा संपूर्ण बातमी
ऑनलाईन कसा काढणार नॉन क्रिमिलेयर दाखला:जाणून घ्या- काय लागतात कागदपत्रे
तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र वा ‘आपले सरकार’ या शासनाच्या संकेतस्थळावरून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढता येते. ऑनलाईन पद्धतीने डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्य़ाची प्रक्रिया जाणून घ्या- येथे वाचा संपूर्ण बातमी
ऑनलाईन कसा काढणार नॉन क्रिमिलेयर दाखला:जाणून घ्या- काय लागतात कागदपत्रे
विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर दाखला गरजेचा असतो. महाविद्यालयात शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय किंवा निमशासकीय, शासनमान्य अनुदानित संस्थेत नोकरीला लागण्यासाठी उमेदवाराला नॉन क्रिमिलेयर दाखला बंधनकारक असतो. - येथे वाचा संपूर्ण बातमी
काय सांगतो नोटीस कालावधी नियम:राजीनामा दिला पण नोटीस पीरियड पूर्ण करणे गरजेचा आहे का
कर्मचारी नोटीसचा कालावधी पूर्ण न करताही नोकरी सोडू शकतात. यासाठी काही अंटीची पूर्तता करणे गरजेचे आहे. कोणत्याही कंपनीत नोटीस पीरियड का पूर्ण करणे आवश्यक असतो आणि कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ते का महत्त्वाचे आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत. - येथे वाचा सविस्तर बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.