आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Cyrus Mistry Mercedes Car Safety Features I How To Take Care When Traveling By Car I Latest News And Update 

मर्सिडीज GLS SUV ने प्रवास करित होते सायरस:सुरक्षा रेटिंग 5 स्टार; पण सीट बेल्ट न लावल्याने जीव गेला, कार प्रवासात ही काळजी जरुर घ्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे एक दिवसापूर्वी रविवारी (4 सप्टेंबर) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार अपघातात निधन झाले. 54 वर्षीय सायरस मिस्त्री 62 लाखापेक्षा जास्त किंमतीची मर्सिडीज GLC 200D SUV कारने प्रवास करित होते. जी सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली मानली जाते. मात्र, महाराष्ट्रातील पालघरजवळ ही कार रस्ता दुभाजकाला धडकली. आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच यात मिस्त्री यांच्याशिवाय त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे (49) यांचा देखील मृत्यू झाला. तर महिला डॉक्टर अनायता पांडोळे आणि कार चालवत असलेले त्यांचे पती दर्यास पांडोळे हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे हे मागील सीटवर बसले होते आणि दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता.

या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ जीएलसीचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ जीएलसीचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

दरम्यान, या घटनेनंतर आम्ही तुम्हाला Mercedes Benz SUV GLC 200D च्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत. तर कारमध्ये प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहीजेत याकडेही सांगणार आहोत...

मर्सिडीज GLC 5-स्टार सुरक्षा रेटिंग
मर्सिडीज-बेंझ GLC ला युरो NCAP द्वारे सर्वोच्च 5-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे. 1950 cc इंजिनद्वारे समर्थित, कारला 7 एअरबॅग्ज, क्रॉसविंड असिस्ट, पार्किंग असिस्ट, अटेन्शन असिस्ट, अडॅप्टिव्ह ब्रेक लाइट्स, टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल डिसेंट कंट्रोल आणि मर्सिडीजची प्री-सेफ ऑक्युपंट प्रोटेक्शन सिस्टम मिळते.

जीएलसीमध्ये प्री सेफ सिस्टीम देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात होण्यापूर्वी खिडक्या आपोआप बंद होतात आणि सीट सर्वात अनुकूल स्थितीत समायोजित होते.
जीएलसीमध्ये प्री सेफ सिस्टीम देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात होण्यापूर्वी खिडक्या आपोआप बंद होतात आणि सीट सर्वात अनुकूल स्थितीत समायोजित होते.

ही कार भारतात सर्वप्रथम 2016 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. 2 जून 2016 रोजी ही कार लॉंच करण्यात आली. कारची एक्स-शोरूम किंमत 62 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 87 लाखांपर्यंत जाते. त्याच्या मॉडेल्समध्ये GLC 200 Progressive, GLC 220d 4MATIC Progressive, GLC 300 4MATIC Coupe, GLC 300d 4MATIC Coupe आणि AMG GLC 43 4MATIC कूप यांचा समावेश आहे.

कार प्रवासात या गोष्टीकडे द्या विशेष लक्ष

  • वाहन चालवताना विचलित होणे टाळा.
  • ऑफ्टिमम वेग मर्यादा राखा.
  • कारमध्ये सीट बेल्ट लावावा,
  • ओव्हरटेक करताना काळजी घ्या
  • इतर वाहनांपासून अंतर ठेवा
  • ट्रॅफिक सिग्नलचे पालन करा

कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्सचा विचार गरजेचा
कार खरेदी करताना, क्रॅश चाचणी रेटिंगसह इतर सुरक्षा वैशिष्ट्ये तपासण्याची खात्री करा. यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, रिअर कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटो डोअर लॉक/अनलॉक, वेअरेबल लॉक/अनलॉक, डेटाइम रनिंग लाइट्स, रिअर डीफॉगर आणि वायपर्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स्, डे/नाईट मिरर यांचा समावेश आहे.

NCAP क्रॅश चाचणी कशी केली जाते?
ग्लोबल कार सेफ्टी एजन्सी NCAP द्वारे जवळजवळ सर्व कंपन्यांच्या कारची क्रॅश चाचणी केली जाते. वेगवेगळ्या स्केलवर क्रॅश चाचण्यांनंतर कारला सुरक्षा रेटिंग दिले जाते. या चाचणीसाठी कारमध्ये डमीचा वापर केला जातो. हा डमी माणसासारखा बनवला आहे. चाचणी दरम्यान, वाहन एका निश्चित वेगाने कठोर वस्तूने धडकले जाते. यादरम्यान कारमध्ये 4 ते 5 डमीचा वापर केला जातो. मागच्या सीटवर एक बाळाचे देखील डमी ठेवला जातो. हे मुलांच्या सुरक्षा सीटवर निश्चित केले आहे. क्रॅश चाचणीनंतर कारच्या एअरबॅग्ज काम करत होत्या का? डमीचे किती नुकसान झाले? कारची सुरक्षा वैशिष्ट्ये कितपत योग्य आहेत? या सर्वांच्या आधारे रेटिंग दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...