आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 'HR' Link Between Company Management Workers: Patil PBS 'HR Excellence Award' Distributed In Jubilation

पीबीएस ‘एचआर एक्सलन्स अवॉर्ड’चे जल्लोषात वितरण:‘एचआर’ कंपनी व्यवस्थापन-कामगारमधील दुवा : पाटील

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनी व्यवस्था आणि कामगार यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम ‘एचआर’ करतो आणि त्यामुळेच ‘एचआर’ला कंपनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे, असे मत राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पुणे बिझनेस स्कूलच्या (पीबीएस) वतीने ‘एचआर एक्सलन्स २०२२ॲवॉर्ड’चे वितरण मंत्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विकफिल्डचे कार्यकारी संचालक मुकेश मल्होत्रा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. पराग काळकर आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पीसीईटी ही संस्था माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केली. त्यांना ज्ञानेश्वर लांडगे, पद्माताई भोसले, शांताराम गराडे, विठ्ठल काळभोर, कै. भाईजान काझी आदींची साथ मिळाली. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संस्थेचा हळूहळू विस्तार होत गेला. या परिक्षण मंडळात सुधीर मतेती, निरज गुप्ता, संग्रामसिंह पवार, डॉ. गीतिका मदन, विनोद बिडवाईक, सौरभ शहा, वैभव देशमुख, डॉ. गिरीश देसाई यांचा समावेश होता. परिक्षकांनी पन्नास जणांची निवड पुरस्कारासाठी केली असे डॉ. त्यागी यांनी सांगितले. यावेळी परिक्षक, पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन डॉ. मिनाक्षी त्यागी, आभार डॉ. मंजू पुनीया चोप्रा यांनी मानले. गौरव शर्मा, डॉ. मिनाक्षी त्यागी, डॉ. मंजू चोप्रा, डॉ. गणेश राव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...