आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेचे यूके युनिट HSBC ने खरेदी केले आहे. ही डील फक्त 1 पौंड म्हणजेच सुमारे 99 रुपयांना झाली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेचे संपूर्ण कर्ज सरकारच्या पाठिशी असल्याने अधिग्रहणांची रक्कम केवळ नाममात्र आहे. म्हणजेच एचएसबीसीला या करारानंतर कोणतेही कर्ज फेडावे लागणार नाही.
HSBC ने सांगितले की, 10 मार्च पर्यंत, सिलिकॉन व्हॅली बँक यूके लिमिटेडकडे सुमारे 5.5 अब्ज पाऊंड कर्ज आणि सुमारे 6.7 अब्ज £ ठेवी होत्या. 31 डिसेंबर 2022 रोजी आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर, SVB UK ने 88 दशलक्ष पाऊंड करपूर्व नफा नोंदवला.
एचएसबीसीच्या वतीने सांगण्यात आले की, सिलिकॉन व्हॅली बॅंकेची मूर्त इक्विटी अंदाजे 1.4 अब्ज पाऊंड असणे अपेक्षित आहे. तर SVB UK च्या मूळ कंपन्यांची मालमत्ता आणि दायित्वे व्यवहारातून वगळण्यात आली आहेत. या अधिग्रहनाला विद्यमान संसाधनांमधून निधी दिला जाईल. HSBC 2 मे रोजी 2023 च्या Q1 निकालांमध्ये या संपादनाबाबत भागधारकांना अपडेट्स करेल.
ग्राहक सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम
या करारानंतर, यूकेचे ग्राहक आणि व्यवसाय ज्यांचे पैसे SVB UK कडे जमा आहेत. ते इतर बँकिंग सेवांसोबत त्यात प्रवेश करू शकतील. सिलिकॉन व्हॅली बँक 10 मार्च पूर्णपणे कोलमडली. बँक कोसळल्यानंतर कोट्यवधी ठेवीदार अडकून पडले आहेत.
सरकार व बँक ऑफ इंग्लंड यांनी ही डील केली सुलभ
यूकेचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सांगितले की, हा करार सरकार आणि बँक ऑफ इंग्लंडने सुलभ केला होता. करदात्याच्या सपोर्टविना ठेवींचे संरक्षण केले जाईल. HSBC ही युरोपातील सर्वात मोठी बँक आहे. SVB UK च्या ग्राहकांना आपली ठेव, रक्कम सुरक्षित वाटली पाहीजे, यादृष्टीने ही डील आहे, असे मत हंट यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा
सिलिकॉन व्हॅलीनंतर US ची सिग्नेचर बँक देखील बंद:बॅंकिंग संकटांचा सामना करण्यासाठी आज तातडीची बैठक
सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) नंतर आता सिग्नेचर बँकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सिग्नेचर बँकेकडे क्रिप्टोकरन्सीचा साठा होता. त्याचा धोका लक्षात घेऊन काही काळ बँक बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी या बँकेच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली होती. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.