आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Https: Www.bhaskar.com Business News Petrol diesel price alert 23 february 2021 update government oil companies latest today news

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेब्रुवारीमध्ये पेट्रोल-डिझेल 15 व्यांदा महागले:दिल्लीत 90.93 आणि मुंबईमध्ये 97.34 रुपये/लिटर झाले पेट्रोल, अजून वाढू शकतात किमती

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी सरकारमध्ये कच्चे तेल 40% स्वस्त झाले पण पेट्रोल 28% महाग झाले

पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये मंगळवारी पुन्हा वाढ झाली. या वाढीसह मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 97.34 रुपये तर दिल्लीत 90.93 प्रति लिटर विकल्या जात आहे. दिल्लीत पेट्रोल-डीझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 35 पैशांची वाढ झाली. राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 101.59 आणि मध्यप्रदेशच्या अनूपनगरमध्ये 101.34 रुपये प्रति लिटर आहेत. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डीझेलमध्ये झालेली ही 15 वी दरवाढ आहे.

54 दिवसांमध्ये 25 वेळा महागले
फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 15 व्या वेळी वाढ झाली आहे. या दरम्यान दिल्लीमध्ये पेट्रोल 4.38 रुपये आणि डीझेल 4.59 रुपये महाग झाले. यापूर्वी जानेवारीमध्ये किंमती 10 वेळा वाढल्या. दरम्यान पेट्रोलच्या किंमतींमध्ये 2.59 रुपये आणि डिझेलमध्ये 2.61 रुपयांची वाढ झाली होती. तर 2021 मध्ये पेट्रोल 7.12 आणि डिझेल 7.45 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे.

ब्रेंट क्रूड 65 डॉलर प्रति बॅरलच्या पार
सोमवारी ब्रेंट क्रूड 65 डॉलर प्रति बॅरलवर गेला. पुढील काही महिन्यांत क्रूड $ 70 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज गोल्डमन सॅक्शने व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारमध्ये कच्चे तेल 40% स्वस्त झाले पण पेट्रोल 28% महाग झाले
मे 2014 मध्ये जेव्हा मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत डॉलर प्रति बॅरल होती. एक बॅरल म्हणजे 159 लिटर. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तीन महिन्यांनंतरच म्हणजेच सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरवर आल्या आणि तेव्हापासून या किंमती कमी आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 65 डॉलर आहे. म्हणजेच मनमोहन सिंह सरकार गेल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास 40% खाली आल्या आहेत.

एका वर्षात कच्च्या तेलात दहा टक्क्यांनी वाढ, पण पेट्रोल 2% टक्क्यांनी महागले गेल्या 1 वर्षात 20 फेब्रुवारी 2020 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 59 डॉलर इतकी होती, जी सध्या 64 डॉलर आहे, म्हणजे कच्च्या तेलाची किंमत 1 वर्षात 8.47% ने महाग झाली आहे. दुसरीकडे, जर आपण पेट्रोलबद्दल बोललो तर या काळात ते 26% महाग झाले आहे. 20 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीत पेट्रोल 72 रुपये प्रति लिटर होते, जे आता प्रति लिटर 90.93 रुपयांवर पोहोचले आहे. मे 2020 मध्ये सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 आणि डिझेलवर प्रति लिटर 13 रुपयांनी वाढ केली.

बातम्या आणखी आहेत...