आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:कार्ड‌्स बिझनेसमध्ये प्रचंड वाढ, रोख प्रवाह कमी झाला ; डेबिट कार्डचा ऑफलाइन वापरही कमी

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने देशात पेमेंट सिस्टिमचा चेहरा बदलला आहे. गेल्या काही वर्षांत कार्ड‌्सचा वापर मोठ्या वेगाने वाढला आहे. याचा डिजिटल वापर वाढल्याने रोख प्रवाह कमी झाला. डिजिटल व्यवहारांच्या सुलभतेमुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डचा ऑफलाइन वापरही कमी झाला आहे. या मुद्द्यांवर दिव्य मराठीने एनपीसीआयच्या सीईओ प्रवीणा राय यांच्याशी चर्चा केली.

मार्चमध्ये क्रेडिट कार्डचा ऑनलाइन वापर ऑफलाइनपेक्षा तीनपट वाढला, कारण ? कोरोना काळात घरात बसून शॉपिंग करण्याची सवय याचे सर्वात मोठे कारण आहे. सोपे आणि सुरक्षित आहे. याशिवाय ऑनलाइन ट्रान्जेक्शंसवर कॅशबॅकसारखे वेगवेगळे इन्सेंटिव्हही मिळतो. काही प्रकारात असे इन्सेटिव्ह कार्ड कंपनी आणि मर्चेंट दोन्हीकडून मिळतो. काही वर्षात कार्ड व्यवसायात कोणता बदल झाला? या प्रकरणात खूप वेगवान वाढ दिसून आली. सध्या देशात सुमारे ७.२ कोटी कार्ड चलनात आहेत. या प्रकरणात, देशाने गेल्या 25 वर्षात जी वाढ पाहिली, त्यापैकी 50% वाढ केवळ गेल्या दोन वर्षांतच दिसून आली. वास्तविक, कोविडच्या काळात रोख रक्कम काढणे आणि बाहेर जाणे या दोन्ही गोष्टी सोप्या नव्हत्या. रुपेची कामगिरी कशी आहे? देशाच्या कार्ड मार्केटमध्ये त्याचा वाटा किती? रुपे कार्डने अल्पावधीतच मोठे यश मिळवले. सध्या, डेबिट कार्ड्सच्या बाबतीत रुपेचा हिस्सा जवळपास 35% पर्यंत पोहोचला, मात्र क्रेडिट कार्डमध्ये त्याचा हिस्सा फक्त 10% आहे. या मोठ्या यशाचे कारण काय ? आम्ही ग्राहकांवर फोकस करतो. याचा वापर कोण करणार ते पाहून कार्ड डिझाइन करतो. तो शहरात असतो की ग्रामीण भागात असतो, त्याचे वय किती आहे. सर्व वर्गाने रुपेला पसंती दिली आहे. आम्ही त्याला यूथफुल ब्रँडप्रमाणे स्थापित करण्याचा प्रयत्नही केला आहे. एनपीसीआय रुपेबरोबरच आयएमपीएस, यूपीआय आणि भीम अॅपसारख्या रिटेल पेमेंट्स सिस्टिमचे अंब्रेला ऑर्गनायझेशन आहे. देशात काय बदल झाला ? सर्वात कमी किमतीत एकाधिक पेमेंट प्लॅटफॉर्मची उपलब्धता हा सर्वात मोठा बदल आहे. हे सर्व प्लॅटफॉर्म देशाला डिजिटल समाजाकडे घेऊन जात आहेत. एनपीसीआयमध्ये, लोकांचे जीवन सोपे बनवणे आणि रोख रकमेचा वापर कमी करणे आमचे ध्येय आहे. यात यश मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...