आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्णभेद:फेअर अँड लव्हलीने वर्णभेदानंतर घेतला धडा, यापुढे ब्रँडनेममधून फेअर शब्द वगळला जाणार

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात वर्णभेद संपवण्यासाठी मोहीम सुरू आहे. यातून धडा घेत एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर ‘फेअर अँड लव्हली’ नावातून ‘फेअर’ शब्द हटवत आहे. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती देत सांगितले की, नवे नाव सर्वांच्या मंजुरीनंतर जाहीर केले जाईल. कंपनी आता नव्याने लाँच केल्या जाणाऱ्या उत्पादनात वेगवेगळे त्वचा रंग असणाऱ्या महिलांच्या प्रतिनिधित्वावर जास्त लक्ष देईल. कंपनीच्या ४५ वर्षे जुन्या या ब्रँडची भारतात वार्षिक ३७५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगभरात कृष्णवर्णीयांसोबतच्या भेदभावाबाबत ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’ मोहीम सुरू आहे. अनेक कलावंतांसह उद्योग जगतातील दिग्गजांनी त्याला पाठिंबा दिला आहे. अमेरिकी कंपनी ग्लोशियरने तिच्या सर्व उत्पादनांतून वंशभेदाचे पर्याय केवळ हटवलेच नाही तर त्याविरोधात सुरू असलेल्या माेहिमेत सुमारे ४ कोटी रुपयांची रक्कम दान दिली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर अनेक वर्षांपासून आरोप होत आहेत की, त्वचेच्या रंगाबाबत ते दुराग्रह निर्माण करत आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी सांगितले की, २०१९ मध्ये कंपनीने दोन चेहरे असलेले कॅमियाे हटवले होते.

बँडएडने रंग आणि शादी डॉट कॉमने सर्च पॅटर्न बदलला

दरम्यान, जॉन्सन अँड जाॅन्सन, ग्लोशियर, शादी डॉट कॉमसह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात वर्णभेदाला चालना देणारे फीचर हटवणे सुरू केले आहे. जॉन्सन अँड जाॅन्सन त्यांचे उत्पादन ‘बँडएड’ची स्किन कलरची पट्टी गडद काळी आणि तपकिरी करणार आहेत. शादी डॉट काॅमने वेबसाइटवरून त्वचेच्या रंगाच्या आधारे जोडीदार शोधण्याचा पर्याय हटवला आहे.

बातम्या आणखी आहेत...