आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण:हैदराबाद, एनसीआर, बेंगळुरूला 60 टक्के एनआरआयची पसंती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रुपयात घसरण आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये सतत तेजीचा कल पाहता अनिवासी भारतीय (एनआरआय) देशात गुंतवणूक वाढवत आहेत. हैदराबाद, एनसीआर आणि बंगळुरू ही घर खरेदीसाठी त्याची टॉप ३ आवडती शहरे आहेत. दुसरीकडे, मुंबई मेट्रोपोलिटन एरिया (एमएमआर) चौथ्या क्रमांकावर आहेत. सीआयआय-अॅनारॉकच्या ताज्या सेंटिमेंट सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. एप्रिल-सप्टेंबर २०२२ च्या या सर्वेक्षणात ६०% अनिवासी भारतीयांनी सांगितले, ते या तीनपैकी कोणत्याही एका शहरात घर खरेदी करतील. २२% लोकांनी हैदराबादमध्ये, २०% एनसीआरमध्ये आणि १८% ने बंगळुरूमध्ये घर खरेदी करण्याचा त्यांचा मानस व्यक्त केला.गेल्या वर्षी याच कालावधीत बहुतांश एनआरआयसाठी बंगळुरू, पुणे आणि चेन्नई टॉप-३ शहरे होती. सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या ५,५०० उत्तर देणाऱ्यांपैकी ७% एनआरआय आहेत, जे सध्या अमेरिका, कॅनडा, आखाती देश, युरोप आणि विविध आशियाई देशात राहत आहेत. बहुतेक अनिवासी भारतीय स्टॉक, म्युच्युअल फंड, सोने आणि मुदत ठेवींपेक्षा भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

महागडी घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या संख्येत वाढ ६३ टक्के एनआरआयने सांगितले की, ते ९० लाख ते १.५ कोटी रुपयाच्या किमतीचे घर विकत घेऊ इच्छित आहेत. गेल्या वर्षी हा आकडा ५९ टक्के होता तर २०१९ मध्ये हा ५५ टक्के होता. सर्वेक्षण केलेल्या ७७% पेक्षा जास्त अनिवासी भारतीयांनी सांगितले की, ते मोठी घरे खरेदी करतील. ५४% लोकांनी ३ बीएचके आणि २३% ४ बीएचके खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. फक्त २२% अनिवासी भारतीय २ बीएचके शोधत आहेत.

भारतात गंुतवणूक आवडते शहर कालावधी टॉप-३ शहर प्री-कोविड (एप्रिल - बंगळुरू, सप्टेंबर २०१९) हैदराबाद आणि एनसीआर कोरोना (एप्रिल-सप्टेंबर २०२१) बंगळुरू, पुणे आणि चेन्नई पोस्ट कोविड (एप्रिल-सप्टेंबर २०२२) हैदराबाद, एनसीआर आणि बंगळुरू

मायदेशी घर असणे प्राधान्य बनले ^‘कोरोनाकाळात परदेशात राहण्याशी संबंधित अनिश्चितता अनिवासी भारतीय विसरलेले नाहीत. मायदेशी घर असणे हे त्यांचे प्राधान्य बनले आहे. गृहकर्जाचे दर आणि मालमत्तेच्या किमती वाढत असतानाही भारतात घर असण्याची भावना कायम आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया त्यांना फायदा देतो. प्रशांत ठाकूर, वरिष्ठ संचालक आणि संशोधनप्रमुख, अॅनारॉक समूह

बातम्या आणखी आहेत...