आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • If The Ethanol Content In Petrol Is 20%, Rs. Rates Can Be Reduced Up To Per Liter News And Live Updates

धूर घटणार...बचत वाढणार:पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20% असल्यास 8 रु. प्रतिलिटरपर्यंत कमी होऊ शकतात दर... केवळ 4 हजारांत सध्याच्या कारचे इंजिनही या इंधनावर धावेल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • ई-20 मुळे 50% घटेल कारद्वारे होणारे कार्बन मोनो ऑक्साइड उत्सर्जन

केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण सध्याचे मानक ८.५% वरून वाढवून २० % करण्याची कालमर्यादा २०३० ऐवजी २०२५ केली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी हे पाऊल खूप चांगले आहे. परंतु सामान्य जनतेच्या मनात त्याविषयी साशंकता आहे. जसे की, इथेनॉल मिसळल्यावर पेट्रोल स्वस्त होईल का? सर्वात मोठी चिंता म्हणजे सध्याच्या गाड्या या नव्या इंधनावर चालू शकतील का? भास्कर/दिव्य मराठीने या विषयावर तज्ज्ञांशी चर्चा केली.

तज्ज्ञांच्या मते, इथेनॉलवरील प्रोसेसिंग खर्च बघितला तर ई-२० इंधन पेट्रोलच्या सध्याच्या दरापेक्षा ८ रुपयांनी प्रतिलिटर स्वस्त होऊ शकते. तथापि ई-२० इंधन सध्याच्या कारची क्षमता कमी करेल. पण गाड्यांमध्ये ई-२० इंधनानुसार बदल करणे खूप महागडे ठरणार नाही. २ हजारांच्या खर्चात सध्याच्या दुचाकी आणि ४ हजारांत चारचाकींचे इंजिन मॉडिफाय करून ई-२० इंधनायोग्य करता येईल. भारतात वाहतुकीच्या गरजेसाठी वर्षाला ८ लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करते. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत आम्ही १.८ लाख कोटींचे कच्चे तेल आयात केले आहे. ई-२० इंधनामुळे वर्षाला ३० हजार कोटींपर्यंत बचत होईल.

ई-२० मुळे ५०% घटेल कारद्वारे होणारे कार्बन मोनो ऑक्साइड उत्सर्जन
ई-१० मुळे (पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल) कार्बन मोनो ऑक्साइडचे उत्सर्जन २०% पर्यंत घटते. ई-२० मुळे (२०% इथेनॉलमिश्रित पेट्रोल) दुचाकी वाहनांद्वारे कार्बन मोनो ऑक्साइडचे उत्सर्जन ३०% आणि चारचाकी वाहनांत ५०% पर्यंत कमी होते. हायड्रोकार्बन उत्सर्जनही २०% अाणि नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन १०% पर्यंत कमी होते. एकूणच १६% हानिकारक उत्सर्जन कमी होईल.

उत्पादन-साठवण वाढवण्यासाठी ४१ हजार कोटी गुंतवणूक हवी
देशात इथेनॉलची एकूण उत्पादन क्षमता ६८४ कोटी लिटर प्रतिवर्ष आहे. २०२५ पर्यंत दरवर्षी इथेनॉलची मागणी ९२१ कोटी लिटर होईल. देशात इथेनॉलची साठवण क्षमताही ३०० कोटी लिटरची आहे. तीसुद्धा तीनपट वाढवण्याची गरज आहे. उत्पादनासाठी बायो-रिफायनरी उभारणी आणि साठवण क्षमता वाढवण्यासाठी ४१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असेल.

सध्याच्या इंजिनांत इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापरामुळे गंज लागण्याची भीती, मायलेजही कमी होईल

  • सरकारने एक अधिसूचना जारी केल्यामुळे ऑटो कंपन्यांना वाहनांचे डिझाइन १२-१५% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर होऊ शकेल, असे करावे लागेल.
  • खरे तर प्रत्येक इंधनाचा एक रीड वेपर प्रेशर (आरव्हीपी) असतो. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले तर आरव्हीपी व्हॅल्यूमध्ये बदल होईल. यामुळे सध्याच्या इंजिनांचे भाग प्रभावित होतील.
  • इंजिनाच्या भागात गंज लागू शकतो. इंजिन झटके देऊन बंद पडू शकते. विशेषत: दुचाकी वाहनांत याची अधिक शक्यता आहे. मायलेजही प्रभावित होईल.
  • वाहन निर्मात्यांची संघटना सियामच्या मते यापासून वाचण्यासाठी इंजिनांचे हार्डवेअर आणि अनेक उपकरणे बदलावी लागतील. इंजिन री-कॅलिबरेशन करावे लागतील. हा खर्च दुचाकी वाहनांत १ ते २ हजार तर चारचाकी वाहनांत ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत येईल.

दिल्लीत पेट्रोल१०२ रु. प्रति लि., इथेनॉल २०% राहिल्यास दर घटून ९४ रु. होतील
सध्या दिल्लीत पेट्रोल १०२ रुपये प्रतिलिटर आणि इथेनॉल ६०-६२ रुपए प्रति लि. मिळते. २०% इथेनॉल मिसळल्यास ८० रुपयांचे पेट्रोल आणि सुमारे १२.५० रुपयांचे इथेनॉल असेल. म्हणजे इंधनाचे दर ९२ रु./लिटर होऊ शकतील. मात्र इथेनॉल ब्लेंडिंगनंतरही इंधनाचे दर निश्चित करणे पेट्रोलियम कंपन्यांच्याच हाती असेल.

बातम्या आणखी आहेत...