आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • If The Income Of 100 Rich People In Corona Period Is Distributed, Then The Poor Get 94 Thousand Rupees Each!

दिव्य मराठी विशेष:कोरोनाकाळातील 100 श्रीमंतांची कमाई वाटली तर गरिबांना प्रत्येकी 94 हजार!

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सफॅमचा ‘द इनइक्वॅलिटी व्हायरस’ अहवाल

जगात कोरोना संक्रमितांचा आकडा १० कोटींवर आहे, तर २१ लाखांवर मृत्यू झाले आहेत. दुसरीकडे, मानवी जीवनातील १०० वर्षांतील या सर्वात मोठ्या संकटातही श्रीमंतांची संपत्ती प्रचंड वाढली आहे. महामारीच्या ९ महिन्यांत देशातील अव्वल १०० श्रीमंतांची कमाई तब्बल १३ लाख कोटी रुपयांनी वाढली. ती देशातील १३.८ कोटी गरिबांमध्ये वाटली तर प्रत्येकाला ९४,००० रुपये मिळतील. ऑक्सफॅमच्या ‘द इनइक्वॅलिटी व्हायरस’ नावाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, महामारीच्या काळात आर्थिक, सामाजिक असमानताही वाढली आहे. अहवालानुसार १८ मार्च ते ३१ डिसेंबरपर्यंत जगात गरिबांची संख्या ५० कोटींनी वाढली आहे, तर अब्जाधीशांची संपत्ती २८४ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. अहवालात अति श्रीमंतांवर जास्त कर लावण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार देशातील श्रीमंत कुटुंबांवर ४% संपत्ती कर लावला तर देशाचा जीडीपी १% वाढू शकतो.

मुकेश अंबानी यांची १ तासाची कमाई एवढी की सामान्य माणसाला त्यासाठी तब्बल १० हजार वर्षे लागतील
रिलायन्सच्या मुकेश अंबानींनी एका तासात जेवढी कमाई केली त्यासाठी अकुशल कर्मचाऱ्याला १० हजार वर्षे लागतील. मार्चमध्ये अंबानींची संपत्ती २.७ लाख कोटी रु. होती, ऑक्टोबरमध्ये ती ५.७ लाख कोटी रु. झाली. म्हणजे दर तासाला ६९ कोटी वाढली. असंघटित क्षेत्रात किमान मजुरी १७८ रु. आहे. त्यामुळे ६९ कोटी कमावण्यासाठी १० हजार वर्षे लागतील.

१० श्रीमंतांच्या कमाईत प्रत्येक व्यक्तीला मोफत लस शक्य
जगातील १० श्रीमंतांची संपत्ती जेवढी वाढली तेवढ्यात प्रत्येकाला मोफत लस दिली जाऊ शकते. भारतातील अव्वल ११ श्रीमंतांनी जेवढा पैसा कमावला त्यात मनरेगा योजना वा आरोग्य मंत्रालयाचा १० वर्षांचा खर्च पूर्ण होऊ शकतो.

एप्रिलमध्ये ताशी १.७० लाख लोक बेरोजगार
सर्वाधिक नुकसान अकुशल कामगारांचे झाले. देशातील १२.२ कोटी कामगारांपैकी ९.२ कोटी म्हणजे ७५% कामगारांना नोकरी गमवावी लागली. एप्रिल २०२० मध्ये तर तासाला सुमारे १.७० लाख लोकांनी नोकरी गमावली.

बातम्या आणखी आहेत...