आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी मे महिन्यापासून व्याजदरात सातत्याने वाढ होत आहे. बँकाही एफडीचे दर वाढवत आहेत. अशा वातावरणात तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक केली आणि त्यानंतर व्याजदर वाढले तर तुमचे नुकसान होईल. वाढत्या व्याजदराचा ट्रेंड कधी थांबेल, हे आत्ताच कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही व्याजदर सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची वाट पाहत गुंतवणूक करणे टाळले तर तुम्ही तोट्यात राहू शकता.
आताच एफडी दर कमी होणार नाही
रिझर्व्ह बँकेने गेल्या ८ महिन्यांत रेपो दरात २.२५% वाढ केली आहे. भविष्यात रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहजिकच, पुढील काही तिमाहीत बँकांचे एफडीचे दरही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी आहे.
फ्लोटिंग रेट एफडीत गुंतवणूक फायद्याचे
फ्लोटिंग रेट एफडीमध्ये व्याजदर वाढवण्याचा फायदा जुन्या गुंतवणुकीवरही मिळतो. व्याजदर वाढत असताना सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होते. अशा गुंतवणुकीमुळे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते.
कसे वेगळे आहेत फ्लोटिंग रेट एफडी
सामान्य एफडीमध्ये ठरलेले व्याज दर असल्याने मॅच्युरिटीनंतर किती पैसे मिळतील याची माहिती असते. मात्र फ्लोटिंग रेट एफडीमध्ये मॅच्युरिटीपर्यंत व्याज दर बदलत असतात. रेपो दरातील बदलांचा बँकांच्या व्याजदरांवर परिणाम होतो.
किती बँका देताय फ्लोटिंग रेट एफडीची सुविधा?
सध्या फक्त आयडीबीआय बँक आणि येस बँक फ्लोटिंग रेट एफडी ऑफर करत आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे, अशी अपेक्षा केली जाऊ शकते की इतर बँकादेखील लवकरच गुंतवणूकदारांना हा पर्याय उपलब्ध करून देतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.