आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • If The Pace Of Recovery Is Maintained, It Is Possible To Achieve 2 To 3% Of GDP In January March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा धडा:रिकव्हरीचा वेग कायम राहिला तर जानेवारी-मार्च 2021 मध्ये 2 ते 3 % जीडीपी हाेणे शक्य

नवी दिल्ली | धर्मेंद्रसिंह भदौरियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल, ऑक्टोबरच्या आकडेवारीतून जाणून घ्या अर्थव्यवस्थेची प्रकृती

देशात अनलॉकची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तशी अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा हाेऊ लागली आहे. सध्या कृषी, वीज वापर, ट्रॅक्टरची विक्री आणि जीएसटी संकलनातील वाढ यासारखी काही क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहेत.गेल्या वर्षापासून चांगली कामगिरी करत आहेत. क्रिसिल इंडिया आणि केअर रेटिंग्जच्या अर्थतज्ज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेत अशीच सुधारणा होत राहिली तर जानेवारी-मार्च २०२१ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जीडीपीमध्ये २ ते ३ % वाढ दिसून येईल. परंतु त्यासाठी काेराेना संसर्गाचा पुन्हा फैलाव व्हायला नकाे. रिझर्व्ह बँक आणि विविध रेटिंग एजन्सी आणि संशोधन संस्थांनी २०२०-२१ आर्थिक वर्षात देशाची जीडीपी वाढ -१५ ते -४ % राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

गाेष्टी..ज्या आशा उंचावतात
आयपीआय : इंडस्ट्रियल प्रॉडक्शन इंडेक्स जो एप्रिल २०२० मध्ये -५७.३ टक्क्यांवर गेला हाेता ताे आॅगस्टपर्यंत - ८ % वर आला आहे.
पीएमआय : मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) देखील सप्टेंबरमध्ये ५६.८ टक्केे व सेवा क्षेत्राचा पीएमआयही ४९.८ टक्क्यांवर गेला आहे.
वीज : सप्टेंबर २०२० मध्ये विजेचा वापर ११३.५४ अब्ज युनिट हाेता, सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत ताे ५.६ % जास्त आहे.
जीएसटी : जीएसटी संकलन एप्रिलच्या ३२,१७२ काेटी रुपयांवरून वाढून सप्टेंबरमध्ये ९५,४८० काेटी रुपयांवर गेला. सप्टेंबर २०१९ पेक्षा ताे ४ % जास्त हाेता.

क्रिसिल इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी.के. जाेशी यांच्या मते जानेवारी - मार्च २०२१ च्या तिमाहीत जीडीपीमध्ये २ % वाढ हाेऊ शकते. परंतु आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील सरासरी वाढ - ९ % राहिल.

केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते शेवटच्या तिमाहीत २.५ ते ३ % वाढ हाेऊ शकते. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरासरी वाढ -८.२ % राहू शकते.

...तरीही या गाेष्टींमुळे साशंकता कायम
- अर्थतज्ज्ञ प्रा. अरुण कुमार यांच्या मते सेवा क्षेत्राचा वाटा ५५ % आहे. सध्या पर्यटनसह अनेक क्षेत्र उघडलेली नाहीत.
- देशाच्या राेजगारात असंघटित क्षेत्राचा वाटा ९४ % आहे. ज्याची गणना सरकार करत नाही.
- कृषी क्षेत्रात फुले, कुक्कुटपालन, डेअरी उत्पादनांना फटका बसला असून त्याचे याेग्य मूल्यांकन झालेले नाही.
- कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरू नये यासाठी नाेव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यात सावध राहिले पाहिजे.

स्रोत : इंडिया ब्रँड इक्विटी फाऊंडेशन, सीओएआय, टेक्नाेपॅक, क्रेडाई, सियाम, फिक्की, असाेचॅम, नॅस्काॅम, विविध अहवाल