आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:कोरोनाची दुसरी लाट आली नाही तर या वर्षी फक्त 10टक्के कमी निर्यात, दिलासा फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन(फियो)चा अंदाज

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जून महिन्यात केवळ १२% घट होण्याचा अंदाज, मेमध्ये निर्यात ३६ टक्के तूट होती
  • चोरी: भारत आयात घटवत राहिला तर चीन हाँगकाँमार्गे येतोय

कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे आर्थिक झटका सोसल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था सावरत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट न आल्यास देशाची निर्यात या वर्षी केवळ १० टक्के कमी होईल. जून महिन्यातही निर्यातही केवळ १२ टक्के कमी होईल. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन(फियो)ने गुरुवारी हा अंदाज व्यक्त केला. याआधी मे महिन्यात निर्यात ३६% घटली होती. फियोचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी सांगितले की, जगभरातील टाळेबंदी उघडल्याने पुन्हा एकदा आर्थिक उत्पादन सुरू झाले आहे. यामुळे मागणी वाढू लागली आहे. अशा स्थितीत अन्य देशांकडून ऑर्डर मिळू लागल्या आहेत. असे असले तरी, त्यांनी हेही सांगितले की, सरकार चनीच्या आयातीवर कठोर निर्बंध लावत असेल तर या अंदाजात मोठी घट येईल. सराफ यांनी सांगितले की, देशाच्या विविध बंदरांवर सरकारी आदेशाशिवाय सीमा शुल्क प्रशासन चिनी मालाची अचानक तपासणी करत आहे. यामुळे खेप येण्यात विलंब होत आहे आणि आयात खर्चही वाढत आहे. दुसरीकडे, काही निर्यातदारांनी सांगितले की, याला प्रत्युत्तर म्हणून हाँगकाँग आणि चीनच्या सीमा शुल्क विभागांनीही भारतातून आलेली निर्याती रोखली आहे. ही समस्या दूर करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही या संदर्भात वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांना पत्र लिहिले आहे.

हाँगकाँगची आयात तपासावी

उद्योग मंडळाने वाणिज्य विभागाकडे हाँगकाँगकडून होणाऱ्या आयातीची तपासणी करण्यास सांगितले आहे. हाँगकाँग गेल्या वर्षी १५६८ कोटी डॉलरसह भारताचा सहावा मोठा आयातदार भागीदार राहिला होता. २०१८ मध्ये हा १३ व्या स्थानी होता. ही अशी परिस्थिती आहे, जेव्हा भारताने सलग दुसऱ्या वर्षी चीनची आयात कमी केली आहे. फियोने स्पष्ट केले की, चिनी कंपन्यांद्वारे स्पेशल अॅडमिनिस्ट्रेशन रिजनद्वारे ७०० कोटी डॉलरचे मोबाइल फोन भारतात आयात केले आहेत.

चीनविरोधी भावनेचा फायदा उचलत अन्य देशांपर्यंत पोहोच वाढवावी

सराफ म्हणाले, जगभरात टाळेबंदी हटवल्यानंतर पुन्हा एकदा वेगाने ऑर्डर मिळू लागल्या आहेत. रद्द झालेल्या ऑर्डरही पुन्हा मिळत आहे. एक उदाहरण देत सराफ म्हणाले, वस्त्रोद्योग क्षेत्राला अशा खरेदीदारांकडून ऑर्डर मिळत आहेत, जे चीनवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत आम्ही जगभरातील चीनविरोधी भावनेचा फायदा उचलला पाहिजे. भविष्यात निर्यात वाढावी यासाठी युरोपीय संघटना, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि जपानमध्ये बळकटीसह अन्य देशांसोबत द्विपक्षीय चर्चेला वेग आणला आहे.

चीनला कच्च्या मालाच्या निर्यातीवर कठाेर धोरणाची शिफारस

फियोचे अध्यक्ष शरदकुमार सराफ म्हणाले, आम्ही चीनच्या अायातीवरील निर्बंधाबाबत संतुलित दृष्टीकोन अंगीकारण्याची गरज आहे. आमचा उद्योग औद्योगिक इनपुटसाठी कोण्या अन्य देशाऐवजी चीनवर जास्त अवलंबून आहे. आम्ही विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांना सल्ला दिला की, चीनला कच्च्या मालाच्या निर्यातीवर कठोर धोरण अवलंबिले पाहिजे. आवश्यकता भासल्यास उपकरही लावला जाऊ शकतो. त्यांनी सांगितले की, चीनला कापसाची निर्यात करतो आणि ते उच्च प्रतीचे कापड तयार करतात. याच पद्धतीने आम्ही महसूल गमावत आहोत. शिवाय आमच्याकडून मसाले घेऊन चीन नफ्यात विकतो.

बातम्या आणखी आहेत...