आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • If You Are Planning To Make A Recurring Deposit, Then First Know Here Which Bank Is Paying How Much Interest; News And Live Updates

आपल्या फायद्याची गोष्ट:​​​​​​​रिकरिंग डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल तर, जाणून घ्या कोणती बँक देत आहे जास्त व्याज?

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुंतवणूक किती रुपयांपासून सुरु करता येईल?

जर तुम्हाला मासिक गुंतवणूक करून मोठा निधी तयार करायचा असेल तर रिकरिंग डिपॉझिट (RD) तुमच्यासाठी योग्य राहील. कारण याद्वारे, आपण कोणत्याही जोखमीशिवाय सहजपणे लहान किंवा मोठी आर्थिक उद्दिष्टे गाठू शकता. रिकरिंग डिपॉझिटवर सध्या यस बँक 6.50% तर IDFC फर्स्ट इंडिया बँक 6% पर्यंत व्याज देत आहे. चला तर मग जाणून घेईया की, आरडी म्हणजे काय? आणि कोणती बँक आरडीवर सर्वात जास्त व्याज देत आहेत.

आरडी म्हणजे काय?
आरडी म्हणजे आवर्ती ठेव. आरडी तुम्हाला मोठी बचत करण्यास मदत करू शकते. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पगारातील काही हिस्सा आरडीमध्ये जमा करत केल्यास त्यांची मुदत संपल्यावर तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम मिळू शकते. हा रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीचा फायदा आहे.

मॅच्यूरिटी पीरियड किती आहे?
आरडीचा मॅच्यूरिटी पीरियड सर्वसाधारणपणे 6 महिने ते 10 वर्ष असतो. विशेष म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक SBI मध्ये तुम्हाला किमान 1 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल.

गुंतवणूक किती रुपयांपासून सुरु करता येईल?
या आरडी योजनेमध्ये तुम्ही दरमहा किमान 100 रुपये गुंतवू शकता. यापेक्षा जास्त रक्कम 10 च्या पटीत जमा करता येईल. कमाल जमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

आरडी खाते कोठे उघडू शकतो?
आरडी ही एक प्रकारची लहान बचत योजना आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेत त्याचे खाते उघडू शकते. सर्व खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये आरडीचे खाते उघडता येतील.

1 वर्षाच्या RD वर कोणती बँक किती व्याज देत आहे?

बँकव्याज दर (% मध्ये)
इंडसइंड बँक6.00
पोस्ट ऑफिस5.80
यस बँक5.75
IDFC फर्स्ट इंडिया5.50
SBI5.00
पंजाब नॅशनल बँक5.00
ICICI4.90

3 वर्षाच्या RD वर कोणती बँक किती व्याज देत आहे?

बँकव्याज दर (% मध्ये)
यस बँक6.25
IDFC फर्स्ट इंडिया6.00
इंडसइंड बँक6.00
पोस्ट ऑफिस5.80
SBI5.30
ICICI5.15
पंजाब नॅशनल बँक5.00

5 वर्षाच्या RD वर कोणती बँक किती व्याज देत आहे?

बँकव्याज दर (% मध्ये)
यस बँक6.50
IDFC फर्स्ट इंडिया6.00
पोस्ट ऑफिस5.80
इंडसइंड बँक5.50
SBI5.40
ICICI5.35
पंजाब नॅशनल बँक5.25
बातम्या आणखी आहेत...