आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायनान्स फॅक्ट:खर्चाच्या 40  पटींत बचत असेल तर आताच घेऊ शकता निवृत्ती

टीम वेल्थ दिव्‍य मराठी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही अशा टप्प्यात पोहोचू शकता जिथून तुम्ही नव्हे तर तुमच्या बचतीचा रक्कम काम करते. म्हणजे तुम्ही जेवढी बचत केली आहे, त्याच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न त्यानंतरच्या गरजांसाठी पुरेशी असेल. असेही नाही की निवृत्त झाल्यानंतरच अशा टप्प्यात पोहोचले जाऊ शकते. निवृत्त झाल्यानंतर निश्चितपणे काम करण्याची गरज भासणार नाही, असेही म्हणता येणार नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यात तुमच्याकडे इतका पैसा येऊ शकतो की तुम्ही उत्पन्नाच्या तणावातून मुक्त होऊ शकाल. हे समजून घेणे यासाठी गरजेचे आहे कारण अन्य बाबींप्रमाणे तुमचे उत्पन्नाचेही लक्ष्य असावे.

फॉर्म्युला किती व्यवहारिक आहे? -फायनान्शियल लाइफ इक्वेशन : समजा तुमचे वय ३० आहे आणि पन्नाशीत तुम्ही कामाच्या कटकटीतून मुक्त होऊ इच्छिता. तुमचा वार्षिक खर्च ६ लाख आहे आणि तुम्हाला वाटते की तुम्ही वयाच्या ८५ वर्षांपर्यंत जिवंत राहाल. अशा परिस्थितीत तुम्ही २० वर्षांपर्यंत बचत करू शकाल आणि नंतरची ३५ वर्षे आरामात जगू शकाल.

- किती पैशांची गरज असेल: समजा तुमच्या पोर्टफोलिओत ६०% इक्विटी आणि ४०% डेटगुंतवणूक आहे. असात ६% च्या सरासरीने महागाई दर आणि निवृत्तीनंतर किमान ७% रिटर्न गृहीत धरल्यास पन्नाशीपर्यंत तुमच्याजवळ ६ कोटी रुपयांची बचत असली पाहिजे.

खरेच ६ कोटी पुरेसे ठरतील? कदाचित ही रक्कम पुरेशी नसेल. याची विविध कारणे असू शकतात. मुलांचे शिक्षण,लग्नासाठी वेगळी बचत करावी लागते. भाड्याच्या घरात राहत असाल तर घर खेरदीसाठीची गुंतवणूक ३०-४० पट बचतीच्या फॉर्म्युल्यात नसेल. याशिवाय कारही बदलावी लागू शकते किंवा घराची डागडुजी करावी लागू शकते. हेही शक्य आहे की आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास खर्च विम्याच्या रकमेपेक्षा अधिक असेल. या खर्चाचाही फॉर्म्युल्यात समावेश नाही. मात्र, हेही लक्षात ठेवले पाहिजे, की हा फॉर्म्युला किमान रिटर्नवर आधारित आहे, जो वाढूही शकतो.

स्टँडर्ड आणि सोपा फॉर्म्युला जर तुमच्याकडे वार्षिक खर्चाच्या साधारण ३०-४० पट रक्कम बचतीत असेल तर तुम्ही आताच निवृत्ती घेऊ शकता. यानुसार तुमचा वार्षिक खर्च १० लाखांच्या जवळपास आहे आणि तुमच्या बँक खात्यात ३-४ कोटी रुपये जमा झाले असतील तर ती उर्वरित जीवन आरामात जगण्यासाठी पुरेशी आहे. वाटल्यास तुम्ही आता निवृत्ती घेऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...