आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक मंत्र:दीर्घ मुदतीत निफ्टीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर एमएनसी फंड वापरा

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅक्टिव्ह फंडात पैसा लावणारे गुंतवणूकदार सेन्सेक्स किंवा निफ्टीच्या तुलनेत जास्त परताव्याची अपेक्षा करतात. ते इंडेक्स फंडात गुंतवणूक करतात, ज्याचा खर्च आणि धोका दोन्ही कमी हाेतो. दीर्घमुदतीत निफ्टीपेक्षा जास्त परतावा शोधत असाल तर एमएनसी फंड पाहू शकता.

सरबजित के सेन एमएनसी फंड थीमॅटिक श्रेणीचे फंड आहे. यात गुंतवणूकदारांचा पैसा बहुराष्ट्रीय कंपन्यां (एमएनसी)च्या शेअर्समध्ये लावला जातो. खरं तर, काही वर्षांत याचा परतावा आकर्षक नव्हते मात्र जर दीर्घकाळाचा सरासरी पाहिली तर वेगळे चित्र दिसून येते. १० वर्षात त्याने निफ्टी ५० टोटल रिटर्न इंडेक्सला मागे सोडले. म्हणूनच, दीर्घ मुदतीसाठी बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा मिळवू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एनएनसी फंड अधिक योग्य आहेत. एसबीआय म्युच्युअल फंड, यूटीआय, आदित्य बिरला सन लाइफ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएनसी श्रेणीत अॅक्टिव्ह फंडाची ऑफर असते.कोटक निफ्टी एमएनसी इंडेक्सवर आधारित ईटीएफची ऑफर असते. म्युच्युअल फंड कंपन्या एमएनसी फंड श्रेणीत १२,३१५ कोटी रुपयाचे मालमत्तेचे व्यवस्थापन करते.

चांगले वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ एमएनसी फंड ५०% पेक्षा जास्त परदेशी प्रवर्तकांच्या भागीदारी असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुुंतवणूक करतात. या श्रेणीच्या योजनेत बेन्चमार्क निफ्टी एमएनसी इंडेक्स आहेत. यात एमएनसीचे ३० शेअर्स आहेत. त्यांचा व्यवसाय एफएमसीजी, ऑटोमोबाइल, हेल्थकेअर, मेटल, मायनिंग, आयटी यांसारख्या क्षेत्रात आहे.

उत्कृष्ट परताव्याची क्षमता भारत जागतिक कंपन्यांसाठी मॅन्युफॅक्चरिंग हब बनत चालला आहे. ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्सिंगसाठी आतापर्यंत चीनवर अवंलबून होत्या, त्यांनी प्लांट भारतात शिफ्ट करणे सुरू केले आहे. त्यामुळे, एनएनसी फंड दीर्घ मुदतीत सातत्यपूर्ण परतावा निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतात.

दर्जेदार गुंतवणूक एमएनसी फंडला दर्जेदार गुंतवणूक मानले जाते. हे स्थापित जागतिक कंपन्यांत गुंतवणूक करतात. प्रसिद्ध ब्रँड, कमी कर्ज आणि प्रतिकूल परिस्थितीतही चांगल्या कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या कंपन्या आहेत. त्यामुळेच अशा फंडांमध्ये अधिक स्थिरता दिसून येते. बाजारात घसरण होत असतानाही ते चांगली कामगिरी करतात.

गुंतवणूक कोणी करावी ३-५ वर्षांसाठी इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एनएनसी हा एक चांगला थीमॅटिक फंड आहे. ज्या गुंतवणूकदारांना जास्त धोका पत्करायचा नाही त्यांच्यासाठी हे चांगले आहे. परंतु इक्विटी पोर्टफोलिओमध्ये थीमॅटिक फंडाचे प्रमाण २०% पर्यंत मर्यादित करा. एमएनसी फंडाचा हिस्सा १०% पेक्षा जास्त नसावा.

बातम्या आणखी आहेत...