आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • IIFL Wealth Hurun List 2022 Latest News, Gautam Adani Earns 1612 Crores Daily From 2021, Mukesh Ambani's Daily Income Is 210 Crores,

हुरुनच्या यादीत अदानी प्रथमस्थानी:गौतम अदानी 2021 पासून दररोज कमावतात 1612 कोटी; तर मुकेश अंबानींची प्रतिदिन कमाई 210 कोटी

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 बुधवारी जाहीर झाली आहे. या यादीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 10.94 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती 7.94 लाख कोटी आहे.

30 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर झालेल्या शेवटच्या यादीपासून, अदानी यांनी दररोज 1612 कोटींची कमाई केली आहे. तर याच काळात अंबानी यांची रोजची कमाई 210 कोटी होती. अदानींच्या संपत्तीत 116% वाढ झाली आहे, तर अंबानींच्या संपत्तीत 11% वाढ झाली आहे. यापुर्वीच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर होते. तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर होते.

या यादीत सायरस पूनावाला तिसऱ्या क्रमांकावर, शिव नाडर चौथ्या क्रमांकावर आणि राधाकिशन दमानी पाचव्या क्रमांकावर आहे. अलख पांडे, प्रतिक महेश्वरी, भारतातील सर्वात नवीन एडटेक युनिकॉर्न फिजिक्स वालाचे सह-संस्थापक आणि क्विक कॉमर्स झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा, पहिल्यांदाच हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये सामील झाले आहेत.

हुरुन लिस्ट लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच लिस्टर्सची एकूण संपत्ती 100 लाख कोटींच्या पुढे गेली आहेत. हे सर्व सिंगापूर, युएई आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे. हुरुनने IIFL वेल्थच्या सहकार्याने हुरुन इंडिया रिच लिस्टची 11 व्या वर्धापनदिनी लिस्ट जाहीर केली.

फिजीक्सवाला संस्थापकांची संपत्ती 4000 कोटी
अहवालानुसार अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी या दोघांची वैयक्तिक संपत्ती 4,000 कोटी रुपये आहे. हे दोघेही 1103 लोकांच्या यादीत हे दोघेही 399 व्या स्थानावर आहेत. कोरोना महामारीच्या काळात पांडे आणि माहेश्वरी यांनी एडटेक कंपनी फिजिक्स वाला सुरू केली. जूनमध्ये त्यांनी 100 डॉलर दशलक्ष निधी उभारला, ज्यामुळे कंपनीचे मूल्य 1.1 अब्ज डॉलर झाले. या यादीत सर्वात तरुण व्यावसायिक 19 वर्षीय कैवल्य वोहरा यांचा समावेश आहे. ​​​

फिजीक्सवालाचे संस्थापक अलख पांडे आणि झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा
फिजीक्सवालाचे संस्थापक अलख पांडे आणि झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा

IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मधील टॉप-10

  • नाव रोजची कमाई
  1. गौतम अदानी : 1612
  2. मुकेश अंबानी : 210
  3. सायरस पुनावाला : 114
  4. शिव नाडार : -139
  5. राधाकिशन दमानी : 57
  6. विनोद अदानी : 102
  7. एसपी हिंदुजा : -151
  8. लक्ष्मी मित्तल : -62
  9. दिलीप संघवी : - 40
  10. उदय कोटक : - 9

यादीत प्रथमच 100 स्टार्टअप संस्थापक

या यादीत प्रथमच 100 स्टार्टअपच्या संस्थापकांचा समावेश झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 5,06,000 कोटी रुपये आहे. त्यांचे सरासरी वय 40 वर्षे आहे. 1,000 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या लोकांचा या यादीत समावेश आहे. यावेळी या यादीत 1103 जणांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत श्रीमंताच्या यादीत 96 ने वाढली आहे. गेल्या 5 वर्षात ही संख्या 62% ने वाढली आहे.

फार्मास्युटिकल क्षेत्राचे सर्वात मोठे योगदान
126 उद्योजकांसह फार्मास्युटिकल क्षेत्राने श्रीमंत यादीत सर्वाधिक योगदान दिले. फार्मा नंतर केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स (102) आणि सॉफ्टवेअर आणि सेवा (84) आहेत. ब्यूटी अँड वेलनेस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म-NYKAA च्या यशस्वी यादीसह, 59 वर्षीय फाल्गुनी नायर, 'बायोटेक क्वीन' किरण मुझुमदार-शॉ, 68, यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिला बनली आहे.

बातम्या आणखी आहेत...