आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • IMF Lowers India's Growth Forecast, Widening Gap Between Rich And Poor; News And Live Updates

वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक:आयएमएफने घटवला भारताचा विकास दराचा अंदाज, गरीब-श्रीमंत देशांतील दरी आणखी रुंद

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या देशांत लसीकरणाचा वेग जास्त, तिथे अर्थव्यवस्था रुळावर परततेय

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने(आयएमएफ) या वर्षी भारताच्या विकास दराच्या अंदाजात ३% ची मोठी कपात केली आहे. आयएमएफने या एप्रिलचा अंदाज १२.५% वरून घटवून ९.५% केला आहे. मात्र, येत्या वित्त वर्षांत जीडीपी वृद्धीच्या अंदाजात १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी जारी वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकमध्ये हेही सांगितले की, कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक सुधारणांच्या बाबतीत जगाला दोन हिश्श्यांत विभागले आहे. ज्या देशांत लसीकरण वेगाने होत आहे, तिथे आर्थिक हालचालीही वेगाने रुळावर परतत आहेत.

मात्र, जे देश या प्रकरणात मागे आहेत ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. आऊटलूकनुसार, या वर्षी आशियाच्या विकसित आणि विकसनशील देशांचा विकास दर एप्रिलमध्ये जारी अंदाजापेक्षा १.१% कमी राहण्याचा अंदाज आहे. भारताच्या बाबतीत ही घसरण सर्वात जास्त ३% आखली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचा विकास दर गेल्या अंदाजापेक्षा ०.६% आणि युरोपीय संघाचा ०.२% जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकमध्ये अर्थव्यवस्था महामारीतून बाहेर पडत रुळावर परतण्याच्या वेगाकडे थेट लसीकरणाशी जोडून पाहिले आहे.

दुसऱ्या लाटेने दिला भारताला झटका
आयएमएफनुसार, या वर्षी भारताचा जीडीपी वृद्धी दर गेल्या अंदाजापेक्षा ३% कमी ९.५% राहील. हा आरबीआयच्या अंदाजासमान आहे. आयएमएफने २०२२ साठी अंदाजित १.६ टक्के वाढून ८.५% केला आहे.

बातम्या आणखी आहेत...