आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या ग्राहकांचा विश्वास परतत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या(सीएमआयई) अहवालानुसार मेच्या मध्यापासून ग्राहक धारणा निर्देशांकात सुधारणा दिसत आहे. एप्रिल आणि मेच्या सुरुवातीस शहरी भारताच्या तुलनेत भारतात यामध्ये बरीच घसरण दिसली होती. मात्र, सीएमआयईने आपल्या साप्ताहिक लेबर मार्केट विश्लेषणात नमूद केले की, या सुधारणेच्या दुसऱ्या लाटेआधी पहिला स्तर म्हणजे, फेब्रुवारी-मार्च २०२१ च्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी बराच दीर्घ प्रवास करावा लागेल.
यानंतर कोविडच्या पहिल्या लाटेआधी पहिल्या पातळीवर पोहोचण्याचे प्रयत्न सुरू राहतील. सीएमआयच्या डेटानुसार, शहरी भारतात एप्रिलमध्ये ७.९% ची घसरण नोंदली. ग्रामीण भारतात यापेक्षा खूप जास्त १७.७% ची घसरण राहिली. सीएमआयईच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागांत संसर्ग वाढल्यानंतर कमकुवत आरोग्य सुविधा आणि पुरेशा लसीकरण सुविधेच्या कमतरतेमुळे जीवन आणि रोजगाराचे बरेच नुकसान झाले आहे. या कारणामुळे एप्रिल-मेमध्ये ग्राहक धारणा निर्देशांकात घसरण आली.
याशिवाय भविष्यात अपेक्षांच्या निर्देशांकातही एप्रिल-मेदरम्यान एकूण घसरण १६.९% नोंदली, तर शहरी भारतात ही घसरण ७.३% राहिली. १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ग्राहक निर्देशांक ४७.३ अंकावर होत १३ जून रोजी संपलेल्या आठवड्यात ४८.९ चा अाकडा स्पर्श केला.
एप्रिल-जून तिमाहीत १२% घटू शकतो जीडीपी : यूबीएस
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेवरील नियंत्रणासाठी बहुतांश राज्यांनी लावलेल्या टाळेबंदीसारख्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन(जीडीपी) थोडेफार वाढण्याऐवजी घटू शकते. गुरुवारी जारी ब्रोकरेज फर्म यूबीएस सिक्युरिटीज इंडियाच्या अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी १२% घटण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षी जून तिमाहीदरम्यान देशाच्या जीडीपीत याच्या तुलनेत खूप जास्त २३.९% घसरण नोंदली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.