आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • In 1917, The Non violent Movement Began With Farmers' Opposition To Blue Farming, From Where Gandhi Was Called 'Bapu'.

15 दिवस विशेष फोटो स्टोरी:1917मध्ये निळीच्या शेतीला शेतकऱ्यांच्या विरोधाने अहिंसक चळवळ पर्वाला सुरुवात, तिथूनच गांधीजींना ‘बापू’ म्हणू लागले

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिले दृश्य अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील एका नीळ बनवणाऱ्या कारखान्याचे आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मजूर नीळ बनवत आहेत. इंग्रजांनी त्यांच्या नफ्यासाठी नीळ शेती अनिवार्य केली होती. या विरोधात १८६०-७० च्या दशकात बंगालमध्ये शेतकरी आंदोलन झाले. येथे इंग्रजांची पिछेहाट झाली. नंतर बिहारच्या चंपारणमध्ये शेतकऱ्यांना नीळ लागवड करण्यास भाग पाडले गेले. १९१० च्या दशकात शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. हा अत्याचार ब्रिटिश सरकारविरुद्धच्या पहिल्या अहिंसक सत्याग्रहाचा आधार ठरला.

१९१५ ः गांधीजी भारतात परतले दुसरे छायाचित्र १९१५ चे आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील हे एक मोठे वळण होते. १९१७ मध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी चंपारण गाठले. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. येथून देशात वेगवान अहिंसक चळवळीचे पर्व सुरू झाले. वर्षभरातच सरकारला नमते घ्यावे लागले. १९१८ मध्ये कायदा झाला व इंग्रज बागायतदारांच्या अत्याचारातून शेतकऱ्यांची सुटका झाली. येथील शेतकऱ्यांनीच गांधीजींना पहिल्यांदा ‘बापू’ म्हणून हाक मारली.

बातम्या आणखी आहेत...