आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • In 2020, The Share Of Chinese Companies In The Smartphone Market Increased By 5%

दिव्य मराठी विशेष:2020 मध्ये स्मार्टफोन बाजारात 5 % वाढली चिनी कंपन्यांची हिस्सेदारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2020 मध्ये विकले 14.5 कोटी स्मार्टफोन, यामध्ये चिनी कंपन्यांची हिस्सेदारी 77 टक्के

चीनसोबतच्या वादामुळे भारतात चीनविरोधातील लाट सोशल मीडियापर्यंतच मर्यादित राहिली आहे. कदाचित याच कारणास्तव २०२० मध्ये देशातील स्मार्टफोनच्या बाजारात चिनी कंपन्यांचे वर्चस्व घटण्याऐवजी वाढले आहे. गेल्या वर्षी भारतीय बाजारात १४.५ कोटी स्मार्टफोन विकले. यामध्ये चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांची ७७% हिस्सेदारी, जी २०१९ मध्ये ७२% होती. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, देश या वर्षी ५ जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ५ जी सुरू होण्यासोबत चिनी स्मार्टफोन कंपन्यांचा दबदबा आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

रिसर्च फर्म कॅनेलीजनुसार, मर्यादेबाबत भारत-चीन राजनैतिक तणावाचा शाओमी, ओपो आणि व्हीवोसारख्या स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांवर किरकोळ किंवा नगण्य परिणाम झाला. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत शाओमीने भारतीय बाजारात १.२ कोटी स्मार्टफोन विकले. ही आपली स्थिती बळकट करत २७% बाजार हिस्सेदारीसोबत अव्वल स्थानावर पोहोचली. सॅमसंगने ९२ लाख स्मार्टफोन विकले. हा २२% हिस्सेदारीसोबत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. वीवो ७७ लाख स्मार्टफोन विकून तिसऱ्या क्रमांकावर राहिली. ओप्पो ५५ लाख स्मार्टफोन विकून रँकिंग सुधारत चौथ्या क्रमांकावर पोहोचली. कॅनलीजचे रिसर्च अॅनालिस्ट वरुण कन्नन म्हणाले, भारताच्या स्मार्टफोन बाजाराच्या राजेशाहीत गेल्या वेळी अशा वेळी बदल झाला जेव्हा देशाने थ्रीजीतून फोरजी तंत्रज्ञान अंगीकारले होते. शाओमी सॅमसंगला दुसऱ्या क्रमांकावर ढकलून अव्वल क्रमांकावर पोहोचली.या वर्षी ५सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. चिनी कंपन्या ही संधी प्राप्त करण्यास तयार आहेत. भारत कोविड-१९ महारोगराईच्या परिणामातून सावरत आहे. अशात २०२१ ची स्थिती चांगली दिसत आहे. कॅनलीजचे संशोधन संचालक ऋषभ दोशी म्हणाले, उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम लागू होणे, देशात ५जी सेवा सुरू होण्याची शक्यता यामुळे उद्योग जगताच्या हालचालीत वेगाने सुधारणा होतील. महामारीने कनेक्टिव्हिटी व लोकांच्या आयुष्यात स्मार्टफोनचे महत्त्व वाढले आहे. भारताचा स्मार्टफोनचा बाजार नव्या तंत्रज्ञानाचा वेगवान स्वीकार करण्यास तयार आहे.

देशात स्मार्टफोनची विक्री प्रथमच घटली

कॅनलीजनुसार २०१९ दरम्यान भारतात १४.८ कोटी स्मार्टफोन विकले होते. गेल्या वर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीत ही संख्या २.०३% घटली आणि १४.५ कोटी स्मार्टफोन विकले. जगात दुसरा मोठा बाजार भारतात प्रथमच एखाद्या पूर्ण वर्षात स्मार्टफोनच्या विक्रीत घट पाहायला मिळाली. मात्र,गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत हॉलिडे प्रमोशनदरम्यान विक्रमी विक्री झाली. चौथ्या तिमाहीत ४.३९ कोटी स्मार्टफोन विकले. २०१९ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत यामध्ये १३% चांगली वाढ पाहायला मिळाली.

बातम्या आणखी आहेत...