आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वास कायम:ढासळत्या अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्यांनी 2.27 लाख कोटी रुपये भांडवल केले जमा

बंगळुरू5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनात रुळावरून घसरलेल्या आर्थिक हालचालीनंतरही गुंतवणूकदारांचा पैसा भारतात

भारतीय कंपन्यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेत विक्रमी २.२७ लाख कोटी रुपयांचे(३१०० कोटी डॉलर) इक्विटी भांडवल जमा केले आहे. रिफिनिटिव्हच्या डेटाआधारित अहवालानुसार, बँक भविष्यात आर्थिक अनिश्चितता पाहता ताळेबंद बळकट करण्याच्या तयारीत आहे. निधी जमवण्यात बँक सर्वात पुढे आहे. यासोबत कंपन्या बाजाराची बदलती स्थिती पाहता तयार करत आहेत.

गुंतवणूक प्राप्त करण्याचा हा विक्रम पहिल्या तिमाहीतील जीडीपी(सकल राष्ट्रीय उतपादन) -२३.९% च्या मोठ्या घसरणीनंतरही झाला आहे. अर्थव्यवस्थेत ४० वर्षांत पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण आली आहे.क्षेत्रनिहाय विचार केल्यास, बँक व वित्तीय संस्था १३६८ कोटी डॉलर जमा करून निधी उभारणीत सर्वात पुढे आहेत. यानंतर ऊर्जा आणि वीज क्षेत्रात ७०५ कोटी डॉलर आणि ग्राहकोपयोगी उत्पादनात ३४१ कोटी डॉलर आहेत. डेटानुसार, देशात सर्वात जास्त जूनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने ७०० कोटी डॉलर जमा केले. आता कंपनीचा भर रिटेल व्यवसाय विस्ताराचा आहे. अहवालानुसार, भारतीय बाजार आणि चांगल्या कंपन्यांतील गुंतवणुकीत विदेशी गुंतवणूकदारांचा कल बळकट आहे.

या ऑगस्टमध्ये सर्वाधिक विदेशी गुंतवणूक
भारतीय इक्विटी बाजारात ऑगस्टमध्ये मोठी विदेशी गुंतवणूक झाली. रॉयर्टसच्या वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये विदेशी गुंतवणुकीने ६०० कोटी डॉलरचा आकडा पार केला आहे. गेल्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूक १००० कोटी डॉलरपेक्षा जास्त झाली आहेे. या वर्षी लॉकडाऊननंतर मार्च महिन्यात एफपीाआय शुद्ध विक्री राहिली. भारतीय इक्विटी मार्केटमधून त्यांनी ८०० कोटी डॉलरपेक्षा जास्त पैसे काढले. एप्रिलमध्येही हे सुरू होते. सध्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता पाहता भारतीय बाजारांमध्ये मे महिन्यापासून पुन्हा एफपीआयमध्ये गुंतवणूक सुरू झाली आहे.

भारतीय बाजारांत पैसा लावण्यासाठी विदेशी गुंतवणूकदार उत्सुक
डेटा रिसर्च अहवालानुसार, भारतीय बाजार आणि कंपन्यांत पैसा लावण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांची उत्सुकता सर्वाधिक आहे. ऑगस्टपर्यंत तीन महिन्यांत भारताच्या बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून शेअरच्या खरेदीत मोठी उसळी दिसून आली. यादरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास ७५,१९० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे शेअर खरेदी केले आहेत.

गुंतवणुकीच्या दृष्टीने २०२० मध्ये रिअल इस्टेट कंपन्या दावेदार असतील
कंपनी सल्लागारांनुसार, २०२० मध्ये आता रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठी दावेदारी दिसेल. याचे कारण म्हणजे कोरोना संकट संपल्यानंतर मालमत्तेच्या मागणीत तेजी येणे निश्चित आहे. सल्लागारांनुसार, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी सरकारी प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका असेल. आगामी काळात अशी पावले, प्रोत्साहन पॅकेज आदींचा स्पष्ट परिणाम दिसेल. तज्ञांनुसार, बँका आणि वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात जमा भांडवलातून स्पष्ट होते की, कंपन्यांना व्यवसाय वृद्धीसाठी कर्जाची कोणतीही समस्या नसली पाहिजे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser