आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • In A Government Action Following Cyrus' Death, Public Opinion On The Notification Was Sought By October 5

सायरस यांच्या मृत्यूनंतर सरकारची अ‌ॅक्शन:रियर सीट बेल्ट अलार्म सिस्टमचा मसुदा जाहीर; 5 ऑक्टोबरपर्यंत अधिसूचनेवर मत मांडण्याचे आवाहन

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कार निर्मात्यांना मागील सीट बेल्टसाठी अलार्म सिस्टम स्थापित करणे अनिवार्य करण्यासाठी मसुदा नियम जारी केला आहे. या मसुद्यावरील अधिसूचनेवर ५ ऑक्टोबरपर्यंत जनतेची मते मागविण्यात आली आहेत. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियांनुसार मसुद्याच्या नियमांमध्ये बदलही करता येतील.

मंत्रालयाने N आणि M वाहनांसाठी हा नियम लागू केला

अधिसूचनेनुसार, मंत्रालयाने एन आणि एम वाहनांसाठी हा मसुदा नियम जारी केला आहे. M श्रेणी म्हणजे चारचाकी वाहन जे प्रवाशी घेऊन जातात. तर दुसरे म्हणजे N श्रेणीत अशा वाहनांचा समावेश होतो. ज्या वाहनांना चार चाके आहेत. ते मालवाहतुकीसाठी तसेच प्रवाशांना नेण्यात येते.

सायरस मिस्त्री यांचे 4 सप्टेंबर रोजी अपघातात निधन
4 सप्टेंबर रोजी 54 वर्षीय सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना देखील सीटबेल्ट वापरण्याच्या नियमावर विचार करू लागले. कारण सायरस मिस्त्री व त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे हे दोघेही सीटबेल्ट विना प्रवास करित होते. ते गाडीत मागच्या सीटवर बसलेले होते.

सायरस गाडीच्या मागच्या सीटवर होते
माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री हे कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले होते. अपघात झाला तेव्हा त्यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. सीटबेल्ट असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. परंतू तसे झाले नाही. या घटनेनंतर सरकारने मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनी देखील सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कायदा करण्यासाठी मसुदा तयार झाला असून त्यावर नागरिकांकडून 5 ऑक्टोंबरपर्यंत मत मांडण्याचे आवाहन केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...