आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्मार्टफोन:भारतात चिनी स्मार्टफोन ब्रँडची बाजारातील भागीदारी 9% घटली

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओप्पो, विवो आणि रिअलमीसारख्या प्रमुख चिनी स्मार्टफोन ब्रँडच्या पुरवठ्यावर परिणाम

भारतीय बाजारपेठेत चिनी स्मार्टफोन ब्रँडची भागीदारी एप्रिल-जून तिमाहीत ९ % घटून ७२ टक्क्यांवर आली आहे. यापूर्वीच्या तिमाहीमध्ये ही ८१% होती. गलवान खोऱ्यातील घटनेनंतर भारतात तयार झालेली चीनविरोधी भावना यामागील कारण मानले जात आहे.

काउंटरपॉइंट कंपनीच्या अहवालानुसार, देशात स्मार्टफोनमध्ये ओप्पो, विवो आणि रिअलमीसारख्या चिनी ब्रँडचा दबदबा आहे. मात्र, या कंपन्यांची भागीदारी घटली आहे. एप्रिल-जून तिमाहीमध्ये देशात स्मार्टफोनची विक्री वार्षिक आधारे ५१% कमी होऊन १.८ कोटी झाली होती. काउंटरपॉइंटमधील रिसर्च अॅनालिस्ट शिल्पी जैन सांगतात, ओप्पो, विवो आणि रिअलमीसारख्या प्रमुख चिनी स्मार्टफोन ब्रँडच्या पुरवठ्यावर परिणाम झाला.