आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • In Ten Years, The Price Of Guar Gum Has Dropped 10 Times, Avoiding More Than A Hundred Factories

जोधपूर:दहा वर्षांत ग्वार गमचे भाव 10  पटीने कमी, शंभरहून अधिक कारखान्यांना टाळे

जोधपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या जोधपूरला जागतिक नकाशावर आणणारा ग्वार गम उद्योग माेडकळीस येताना दिसत आहे. स्वस्त चायनीज पर्यायामुळे आधीच घटलेली ग्वार गमची मागणी आता वाढत्या खर्चामुळे आणि कंटेनरच्या मालवाहतुकीमुळे आणखी घसरताना दिसत आहे. दहा वर्षांत ग्वार गमचे भाव दहा वेळा खाली आले आणि शंभरहून अधिक कारखाने बंद पडले, अशी स्थिती आहे.

पेट्रोलियमपासून ते अन्न, खाणकाम आणि कापड या सर्व गोष्टींमध्ये वापरल्या जाणाऱ्या ग्वार गमचा दरवर्षी जगभरात ३.४० लाख टन वापर केला जातो. यापैकी ३ लाख टन ग्वार गमचे उत्पादन भारतात होते. भारतातही ग्वार गमचे ८०% उत्पादन राजस्थानमध्ये, मुख्यतः जोधपूरमध्ये होते. दहा वर्षांपूर्वीपर्यंत जोधपूरची जागतिक ओळख ग्वार गममुळे होती, पण त्यानंतर परिस्थिती बदलू लागली. इतर पर्याय आले आणि ग्वार गमची मागणी कमी होऊ लागली. त्यामुळे २०१२-१३ मध्ये १,२०० रुपये किलोने विकला जाणारा ग्वार गमचा भाव आता १२५ रुपये किलोवर आला आहे. २०१२-१३ मध्ये शहरात ग्वार गमचे १२० पेक्षा जास्त कारखाने होते, ते आता १० वर आले आहेत. आता त्यांच्यावरही टाळेबंदीचा धोका निर्माण झाला आहे. मरुधारा इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष एसके शर्मा म्हणाले की, कंटेनरची कमतरता आणि मालवाहतूक ही निर्यातीतील नवीन समस्या बनली आहे. वाढीव मालवाहतूक खर्चाचा बोजा खरेदीदार सोसायला तयार नाहीत. त्याच वेळी, जोधपूरची मुख्य स्पर्धा पाकिस्तानशी आहे, ज्याला एका डॉलरसाठी भारतापेक्षा दुप्पट पैसे मिळतात. हे नवे संकट

कंटेनर्स| निर्यातीसाठी पुरेसे कंटेनर मिळत नाहीत. जे मिळत आहे त्याच्या किमतीही जवळपास दुप्पट झाल्या आहेत. वीज: ग्वार गम उद्योगात विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, परंतु विजेचे दर सातत्याने वाढत आहेत. मजूर: कोविडमुळे अनेक मजूर आपापल्या गावी गेले, त्यांच्या न परतण्यामुळेही अडचणी निर्माण होत आहेत.

अशा प्रकारे बिघडली उद्याेगाची स्थिती 95

खाण/वस्त्र| वस्त्र व खाणकामात ग्वार गमची जागा इतर पर्यायांनी घेतली, विशेषतः स्टार्चचा वापर वाढला. अन्न उद्याेग| बेकरी, आइस्क्रीम, चाॅकलेट व पेयांत वापरल्या जाणाऱ्या ग्वार गमची जागा स जैंथनगमन व स्टार्चने घेतली आहे. पेट्रोलियम उद्याेग| चीनचे जैंथनगम व अमेरिकेचे स्वच्छ पाणी आणि हिरवे पाणी यांनी ग्वार गमची जागा घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...