आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा पॉलिसी:वाढत्या विमा घोटाळा प्रकरणांच्या काळात अवश्य घ्या तीन खबरदाऱ्या, ​​​​​​​विम्याची गोष्ट सतर्कता न ठेवणारे सहज हाेऊ शकतात लक्ष्य

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमा पॉलिसी खरेदी करतेवेळी सतर्क नसणारे ग्राहक फसवणूक करणाऱ्यांसाठी सहज लक्ष्य ठरतात

भारतीय विमा उद्योगाला घोटाळे किंवा फसवणुकीमुळे दरवर्षी कराेडाे रुपयांचे नुकसान सहन करावे लागते अाणि हीच गाेष्ट त्याच्या विकासात बाधा अाणण्याचा मुख्य अडसर अाहे. या फसवणूकीचा परिणाम उद्योग आणि समाज या दोहोंवर होतो, कारण गरजू लोकांना विम्याचा लाभ मिळण्यामध्ये अडथळा अाणण्याचे ते काम करतात. फसवणुकीसारख्या घटना विमा कंपन्यांच्या कामकाज खर्चात वाढ करतात तसेच त्यांचे स्रोत दिवाळखोर बनवतात. त्यामुळे ग्राहकांना त्याची किंमत चुकवावी लागते. कधीकधी जास्त प्रीमियम भरावा लागतो. अशा फसवणुकीमुळे विमा कंपनीला वैध दावे निकाली काढण्यात अडचणी येतात. विमा पॉलिसी खरेदी करतेवेळी सतर्क नसणारे ग्राहक फसवणूक करणाऱ्यांसाठी सहज लक्ष्य ठरतात. अशा घटनांना बळी न पडण्यासाठी सतर्क राहणे अाणि काेणताही निर्णय घेण्याच्या अाधी सर्व गाेष्टींची पडताळणी चांगल्या प्रकारे करणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे अाहे. त्यासाठी अशा प्रकारे काही विशेष खबरदारी घ्या.

1. सुरक्षित पेमेंटचा पर्याय निवडा

आपण फक्त धनादेश, डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा देयकाच्या अन्य ऑनलाइन पद्धतींद्वारे थेट विमा कंपनीला प्रीमियम द्यावा असा सल्ला अाम्ही देताे. हे व्यवहाराची लिंक स्थापित करण्यास मदत करते, जे रोख देण्यात शक्य नाही. असे केल्यास तुम्ही काेणाला रक्कम दिली याचा पुरावा तुमच्याकडे असेल.

2. चॅनलची पडताळणी करा, एजंटाकडे आयडी मागा

आपण अस्सल विमा चॅनलकडून पॉलिसी खरेदी करत आहात की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आपण ऑनलाइन पॉलिसी खरेदी करत असल्यास, इन्शुरर वेबसाइटचे डोमेन प्रत्यक्ष आहे की नाही ते तपासा. फसवणूक करणारे बनावट वेबसाइट वापरून फसवणूक करतात. एजंटकडून पॉलिसी खरेदी करत असाल तर त्याकडे आयडी मागा व खरेदी केल्यानंतर विमा कंपनीबरोबर पॉलिसीची पुष्टी करा.

3. कंपनीशी संपर्क साधून पाॅलिसीची सत्यता तपासा
पाॅलिसीच्या अटी व शर्ती समजून घेणे आणि आपण खरेदी केलेली पाॅलिसी अस्सल आहे की बनावट आहे हे तपासणे महत्वाचे आहे. यासाठी, कोणीही विमा कंपनीशी संपर्क साधू शकतो आणि पॉलिसी क्रमांक शेअर करून त्याची सत्यता तपासू शकतो. विमाधारकांच्या वेबसाइटवर क्यूआर कोड सुविधा आहे, जेथे पॉलिसी अस्सल आहे की बनावट आहे हे ग्राहक तपासू शकतात.

एक सतर्क ग्राहक बऱ्याच फसवणूक राेखू शकताे. याशिवाय विमा कंपन्या संभाव्य फसवणुकीची ओळख पटविण्यासाठी व फसवणूक करणाऱ्यांना पकडण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स, डेटा अॅनॅलिटिक्स आणि तंत्रज्ञानदेखील वापरत आहेत. विमा उद्याेग सरकार आणि नियामक यांच्या मदतीने या समस्येवर अंकुश ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील अाहे.

बातम्या आणखी आहेत...