आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • In The Grip Of Apple Scrub Disease In Himachal, Production Fell By 1 Third; Rates Are Higher At The Beginning Of The Season, Less Likely To Bring Relief In The Near Future

संकट:हिमाचलमध्ये सफरचंद स्क्रॅब रोगाच्या विळख्यात, उत्पादन 1 तृतीयांश घटले; हंगामाच्या सुरुवातीलाच दर महागले, आगामी काळात दिलासा मिळण्याची शक्यता कमी

गुलशन कुमार | चंदीगड/सिमलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा महाग असतील सफरचंदांचे दर, हंगामाच्या सुरुवातीलाच 30-40% महागले

हिमाचल प्रदेशात सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या भागावर स्क्रॅब रोगाचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सफरचंदांच्या एक तृतीयांश रोपांवर परिणाम झाला आहे. उत्पादन कमी झाल्याने या वर्षी सफरचंदाचे दर जास्त असण्याचीही शक्यता आहे. तज्ञांनुसार, या रोगामुळे या वर्षी हिमाचल प्रदेशात सफरचंदांचे उत्पादन सुमारे एक कोटी पेट्या कमी असेल. याचा परिणाम देशातील सफरचंदांच्या किमतीवरही होईल. गतवर्षी रॉयल सफरचंदांची २५ किलोची पेटी १५,००० रुपयांना विकली जात होती. या वेळी ही किंमत २६०० ते ३००० रुपये आहे. आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

ठियोगमधील पराला येथील सफरचंद विक्रेते अतुल राजटा यांच्यानुसार, हिमाचल प्रदेशात खालील भागांमध्ये सफरचंदाची आवक सुरू आहे. यांचे दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आगामी काळात रेड गाला व किन्नौरमधील सफरचंदांचे दर आणखी जास्त असतील. गुजरात आणि महाराष्ट्राला सफरचंद पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांनुसार, हंगामाच्या सुरुवातीलाच दर वाढले आहेत. तसेच उत्पादन घटल्याने रॉयल आणि रेड गोल्डन सफरचंदही १५० ते २०० रुपये प्रती किलो दराने मिळण्याची शक्यता आहे.

जुलै ते ऑक्टोबर असतो हंगाम

ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या सफरचंदांच्या हंगामात सुमारे ३.५ कोटी ते ३.७५ कोटी पेट्यांचे उत्पादन होते. यात सर्व प्रकारचे सफरचंद असतात. यंदा हे उत्पादन २.२५ ते २.५ कोटी पेट्या राहण्याची शक्यता आहे.

१.१२ लाख उत्पादक सफरचंद बागांशी संबंधित

हिमाचल प्रदेशातील सुमारे १.१२ लाख उत्पादक सफरचंदांच्या बागांशी संबंधित आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये यात वाढ झाली आहे. सफरचंद उत्पादनाचे हिमाचलच्या जीडीपीमध्ये सुमारे ४,५०० कोटींचे योगदान आहे. यंदा उत्पादन कमी असेल. मात्र दर चांगले असल्याने, नुकसान कमी होईल. हिमाचल प्रदेशातील सिमला, कुलू, मंडी, चंबा, सिरमौर व किन्नौरमध्ये सफरचंदांचे सर्वाधिक उत्पादन होते.

दर कमी होण्याची शक्यता नाही

स्क्रॅब रोगामुळे सफरचंदाची आवक कमी आहे. उत्पादनावर परिणाम झाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच दर वाढले आहेत. दक्षिण भारतातूनही मागणी वाढली आहे. अशा वेळी दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. -गौरव करोल, व्यापारी , सिमला

बागेतील ओलाव्यामुळे पसरतो स्क्रॅब रोग

या प्रदेशात सफरचंदांचे चांगले उत्पादन बहर येण्यावर अवलंबून असते. पावसामुळे बागांमध्ये जास्त ओलावा निर्माण झाला आहे. यामुळे स्क्रॅब रोग जास्त प्रमाणात पसरतो. यामुळे सफरचंदांच्या पानाला बुरशी लागण्यास सुरूवात होते. नंतर हळूहळू सफरचंदांवर काळे डाग पडण्यास सुरुवात होते. याच्या परिणामाने सफरचंदांना बाजारात चांगले दरही मिळत नाहीत. शेतकऱ्यांनी केलेले सर्व कष्ट वाया जातात.

बातम्या आणखी आहेत...