आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • In The Regulatory Sphere That Influences Social Media News And Updates In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे नियामकीय कक्षेत; कंटेंट पोस्ट की प्रमोशनल, सांगावे लागेल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर प्रभावशाली पोस्ट टाकून एखाद्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आता सोपे असणार नाही. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया(एएससीआय) या प्रकरणात पारदर्शकता आणत आहे. दिशानिर्देशांच्या मसुद्यानुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणजे लोकांचे मत प्रभावित करण्यात सक्षम असणाऱ्या लोकांना एखादा ब्रँड वा उत्पादनाच्या प्रोत्साहनाशी संबंधित सामग्रीबाबत पुरेशी माहिती जाहीर करावी लागेल.

एसपीआय डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातींबाबतच्या दिशानिर्देशांबाबत तयार मसुद्याला मार्चअखेरपर्यंत अंतिम रूप दिले जाऊ शकते. याआधी यावर लोकांचे मत आजमावले जाईल. दिशानिर्देशांच्या प्रस्तावित मसुद्यात नमूद केले की, जाहिरातीच्या सामग्रीसाठी डिसक्लोजर लेबल हायलाइट करावे लागेल. हे कंटेंटच्या वर असले पाहिजे. काही अशा प्रकारच्या सर्व डिव्हायसेसवर स्पष्ट दिसेल. यामध्ये हेही सांगितले की, डिसक्लोजर लेबल्स कुण्या प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या कंटेंटच्या पहिल्या २ ओळींत दिसून येईल. संपादकीय आणि स्वतंत्र युजरकडून तयार केलेल्या जाहिरातीच्या कंटेंटचे सादरीकरण हे असे असले पाहिजे की, सामान्य ग्राहकाला हे प्रमोशनल कंटेंट आहे, सामान्य नाही हे सहजपणे समजले पाहिजे. या दृष्टीने एक डिसक्लोजर लेबल हवे, ही निवड मंजूर यादीतून करावी लागेल. एएससीआयच्या मंजूर लेबल्समध्ये अॅड, कोलॅब, प्रोमो, प्रायोजित वा भागीदारी समाविष्ट आहे. सोशल मीडियावर अॅड कंटेंट टाकणाऱ्यांना यापैकी एकाचा वापर करावा लागेल. यामुळे त्यांना पाहून युजरचा संभ्रम होणार नाही. भारतीय इन्फ्लुएन्सर बाजार वार्षिक ५४३-१,०८७ कोटींदरम्यान आहे.

पोकळे दावे चालणार नाहीत, दुजोरा हवा
दिशानिर्देशांच्या मसुद्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना हेही निश्चित करावे लागेल की, कोणत्या ब्रँडच्या डिजिटल प्रमोशनल कंटेंटला खूप वाढवून दाखवण्यासाठी कोणते फिल्टर वापरले गेले नाही. ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेता इन्फ्लुएन्सर्सना हेही निश्चित करावे लागेल की, ब्रँडकडून केलेल्या कोणत्याही तांत्रिक वा कामगिरीशी संबंधित दाव्याला दुजोरा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...