आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रिसर्च:लॉकडाऊनच्या 2 महिन्यांत 20 कंपन्यांनी बाजार भांडवलात जोडले 7.6 लाख कोटी, निम्मा वाटा एकट्या रिलायन्सचा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नफ्यात असणाऱ्या कंपन्यांमध्ये 75 वर्षे जुनी महिंद्रा अँड महिंद्रा व नवीन बंधन बँकही

लॉकडाऊनच्या दोन महिन्याच्या (२५ मार्च ते ३० जून) काळात बहुतांश कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. अनेक कंपन्यांचे तर उत्पन्नच बंद झाले होते. मात्र या काळात २० कंपन्या अशा आहेत ज्यांच्या बाजार भांडवलात साडेसात लाख कोटींपेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांचाही मोठा फायदा झाला. दैनिक भास्करच्या अध्ययनातून हे चित्र समोर आले आहे. संशोधनानुसार, साडेसात लाख कोटींपेक्षा जास्त असलेल्या या बाजार भांडवलात निम्मा वाटा एकट्या रिलायन्स समूहाचा आहे. जिओची भागीदारी विकून पैसे उभारण्यासाठी कंपनीने एप्रिलपासून सुरू केलेल्या प्रयत्नांचा परिणाम कंपनीच्या समभागांवरही दिसला. २५ मार्चला ११०३ रुपये असलेल्या रिलायन्सच्या समभागांची किंमत ३० जूनला १७०४ रुपये झाली. यामुळे गुंतवणूकदारांच्या फायद्यासह कंपनीचे बाजार भांडवलही ३,९४,३७४ कोटींवर पोहोचले. रिलायन्सनंतर सन फार्मा ही सर्वात फायद्यात असलेली कंपनी आहे. 

या २ महिन्यांत कंपनीच्या बाजार भांडवलात ३० हजार कोटींची वाढ झाली. टक्केवारीत सर्वाधिक नफ्यात असणारी कंपनी अरबिंदो फार्मा आहे. कंपनीच्या बाजार भांडवलात २५,६६४ कोटींची भर पडली, जे एकूण बाजार भांडवलाच्या १३१.३३ टक्के आहे. संशोधनात समोर आलेल्या सर्वोच्च २० कंपन्यांमध्ये सहा औषध निर्मिती कंपन्या आहेत. जगभरात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉलच्या मागणीमुळे औषध कंपन्यांना फायदा झाला आहे. यादीत ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्याही आहे. लॉकडाऊनच्या आधी बहुतांश ऑटो कंपन्यांचे समभाग तोट्यात होते. मात्र लॉकडाऊनच्या काळातच या कंपन्यांच्या समभागात वाढ नोंदवण्यात आली. यामुळे २० कंपन्यांच्या यादीत पाच ऑटो कंपन्यांचाही समावेश आहे. हे प्रमाण औषध निर्माता कंपन्यांनंतर सर्वाधिक आहे.

पाच वर्षे जुनी बंधन बँक टॉप-५ मध्ये
यादीतील आणखी एक चकीत करणारे नाव बंधन बँकेचे आहे. बँकिंग क्षेत्र दबावात असताना बँकेने टॉप- ५ कंपन्यांमध्ये स्थान पटकावले आहे. यादीत ही एकमेव बँक आहे. लॉकडाऊनच्या दोन महिन्यांनंतर बँकेचे बाजार भांडवल दुप्पट झाले. अरबिंदो फार्मानंतर सरासरीच्या बाबतीत नफ्याच्या दृष्टीने बंधन बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे.