आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Including SBI Many Banks Have Hike FD Rates I Interest Rates Comparison; SBI Bank Axis Vs HDFC Vs ICICI Vs PNB Kotak Bank, Latest News 

SBIसह अनेक बॅंकांनी FD दरात केली वाढ:एफडी करण्यापूर्वी समजून घ्या कुठे होईल सर्वाधिक फायदा; वाचा- बॅंकनिहाय व्याजदर

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठी बॅंक म्हणून स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) ची ओळख आहे. एसबीआयसह अ‌ॅक्सिस बॅंक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंकासह देशातील अनेक प्रमुख बँकांनी मुदत ठेवींच्या म्हणजेच एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही एफडी घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला तत्पूर्वी बँकांच्या व्याजदरांची माहिती घ्यावी. आम्ही तुम्हाला SBI सह इतर मोठ्या बँकांच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अधिक सोपे होणार आहे.

येथे जाणून घ्या, खालील ग्राफिक्समधून कोणत्या बॅंकेत किती मिळेल एफडीवर व्याजदर

FD मधून मिळणाऱ्या व्याजावरही कर भरावा लागतो
FD मधून मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र असते. तुम्ही एका वर्षात FD वर जे काही व्याज मिळवाल ते तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाईल. एकूण उत्पन्नावर आधारित तुमचा कर स्लॅब निश्चित केला जातो. FD वर मिळविलेले व्याज उत्पन्न "इतर स्त्रोतांकडून मिळकत" म्हणून मानले जात असल्याने, ते स्रोत किंवा TDS अंतर्गत कर वजा केले जाते. जेव्हा तुमची बँक तुमचे व्याज उत्पन्न तुमच्या खात्यात जमा करते, त्याच वेळी TDS कापला जातो.

एफडीवरील कराशी संबंधित काही मुद्दे जाणून घेऊया :

  • तुमचे एकूण उत्पन्न एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास बँका मुदत ठेवींवर टीडीएस कापत नाहीत. तथापि, यासाठी तुम्हाला फॉर्म 15G किंवा 15H सबमिट करावा लागेल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला TDS वाचवायचा असेल तर फॉर्म 15G किंवा 15H नक्कीच सबमिट करा.
  • तुमचे सर्व FDs मधील व्याजाचे उत्पन्न एका वर्षात रु. 40,000 पेक्षा कमी असल्यास TDS कापला जात नाही. दुसरीकडे, तुमचे व्याज उत्पन्न 40,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, 10% TDS कापला जाईल. पॅन कार्ड न दिल्यास बँक 20% कपात करू शकते.
  • 40,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज उत्पन्नावर TDS कापण्याची ही मर्यादा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी आहे. दुसरीकडे, FD मधून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे 50,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 10% TDS कापला जातो.
  • जर बँकेने तुमच्या FD व्याज उत्पन्नावर TDS कापला असेल आणि तुमचे एकूण उत्पन्न आयकराच्या अधीन नसेल, तर तुम्ही कर भरताना कापलेल्या TDS वर दावा करू शकता. हे तुमच्या खात्यात जमा होईल.
बातम्या आणखी आहेत...