आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Income Tax Payers Will Not Be Able To Participate, Atal Penshion Scheme, Know New Rules Regarding This

1 ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजनेत बदल:आयकरदाते या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत, जाणून घ्या, यासंबंधित नवीन नियम

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील महिन्यापासून अटल पेन्शन योजनेत (APY) मोठा बदल होणार आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून आयकर भरणारी व्यक्ती म्हणजेच करदाते या योजनेत सामील होऊ शकणार नाहीत. सद्या कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही करदाते असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फक्त काही दिवसांचा वेळ आहे. दरम्यान, आधीच जोडलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत राहील. 1 ऑक्टोबर 2022 पूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत जर एखादी व्यक्ती, जरी तो करदाता असला तरीही, या योजनेत सामील झाला, तर त्याला या योजनेचा लाभ मिळत राहील. त्याच वेळी, आधीच जोडलेले सर्व करदाते देखील पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

या योजनेत 5000 रुपये पेन्शन मिळते

अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा रु. 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. अशा परिस्थितीत या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळाला आर्थिक सुरक्षा देऊ शकता.

ऑनलाइन खाते उघडता येते
या योजनेत सामील होणाऱ्यांची संख्या 4 कोटींच्या पुढे गेली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) नुसार अटल पेन्शन योजनेअंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच FY2021-22 मध्ये 99 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली. सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका APY योजना ऑफर करतात. आम्ही येथे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अटल पेन्शन योजनेची ऑनलाइन खाते उघडण्याची प्रक्रिया सागंत आहोत.

तुमचे योगदान तुमच्या वयानुसार ठरवले जाते
निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे. यावर किती रक्कम कापली जाईल हे अवलंबून असेल. दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला दरमहा 42 ते 210 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 18 व्या वर्षी योजना घेतल्यानंतर हे होईल. त्याचवेळी जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना घेतली तर त्याला 291 रुपये ते 1,454 रुपये प्रति महिना योगदान द्यावे लागेल. ग्राहक जितके जास्त योगदान देईल तितके जास्त पेन्शन त्याला निवृत्तीनंतर मिळेल.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार हप्ता भरू शकता
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक म्हणजेच 6 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. योगदान स्वयं-डेबिट केले जाईल. म्हणजे रक्कम आपोआप तुमच्या खात्यातून वजा केली जाईल आणि तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल.

ग्राहकाच्या मृत्यूनंतर त्याचा जोडीदाराला पेन्शन मिळेल
ग्राहकाच्या मृत्यूनंतर पती/पत्नीला समान पेन्शन दिले जाईल. सदस्य आणि पती / पत्नी या दोघांच्या मृत्यूनंतर, 60 वर्षे वयापर्यंत जमा झालेली पेन्शन रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल. तर, 60 वर्षापूर्वी ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, त्याचा जोडीदार APY खात्यात योगदान देणे सुरू ठेवू शकतो. सबस्क्राइबरच्या जोडीदाराला समान पेन्शनची रक्कम मिळण्याचा हक्क असेल. दुसरीकडे, योजनेप्रमाणे रक्कम भरू शकत नसल्यास APY खात्यात जमा केलेले सर्व पैसे काढू शकतो.

बँकेत जाऊनही खाते उघडता येते
तुम्ही कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता. तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि विनंती केलेल्या कागदपत्रांसह बँकेच्या शाखेत जमा करावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल.

अटल पेन्शन योजनेशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न: मी बचत खात्याशिवाय एपीवाय खाते उघडू शकतो का?
उत्तर: नाही, या योजनेसाठी बचत बँक खाते असणे आवश्यक आहे.

प्रश्न: मासिक योगदानाची तारीख कशी ठरवली जाते?
उत्तर: पहिल्या गुंतवणुकीच्या तारखेच्या आधारावर हे ठरवले जाते.

प्रश्न: सदस्यांसाठी नॉमिनी असणे आवश्यक आहे का?
उत्तरः होय, नॉमिनी असणे आवश्यक आहे.

प्रश्नः अटल पेन्शन योजनेंतर्गत किती खाती उघडली जाऊ शकतात?
उत्तर: अटल पेन्शन योजनेचे फक्त एक खाते उघडण्याची परवानगी आहे.

प्रश्न: मासिक योगदानासाठी खात्यात शिल्लक नसल्यास काय?
उत्तर: मासिक योगदान देण्यासाठी तुमच्या खात्यात शिल्लक नसल्याबद्दल दंड आकारला जाईल.

बातम्या आणखी आहेत...