आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ:10 जानेवारीपर्यंत दाखल करता येईल ITR, यापूर्वी 31 डिसेंबर होती शेवटची तारीख

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑडिट असलेल्या खात्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ

सरकारने इनकम टॅक्स फाइल करण्याचा कालावधी वाढवला आहे. आता 10 जानेवारीपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरता येईल. यापूर्वी ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. हा ITR फायनांशियल इअर 2019-20 साठी असेल. अर्थ मंत्रालयाने बुधवारी संध्याकाळी याबाबत माहिती दिली.

या वर्षी आतापर्यंत 4.37 कोटी ITR

28 डिसेंबरपर्यंत 4.37 कोटी ITR भरण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वयक्तिकरित्या इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही, ते 10 जानेवारीपर्यंत रिटर्न फाइल करू शकतात. याप्रकारे टॅक्स भरणारे लोक ITR 1 किंवा ITR 4 फॉर्मचा उपयोग करू शकतात. पहिल्यांदा ITR ची तारीख 31 जुलै ते 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. यानंतर 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता ही तारीख 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ऑडिट असलेल्या खात्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ

अर्थ मंत्रालयाकडून जारी प्रेस नोटनुसार, जे लोक टॅक्स भरतात आणि त्यांच्या खात्याचे ऑडिट होते किंवा, ते लोक ज्यांच्या इंटरनेशनल फायनांशियल ट्रांजेक्शनची रिपोर्ट द्यावी लागते, त्यांना ITR भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आली आहे. यासोबतच सरकारने टॅक्स ऑडिट रिपोर्टची शेवटची तारीख वाढवून 15 जानेवारी 2021 केली आहे.

बातम्या आणखी आहेत...