आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Income Tax Return; Filing New Tax System Vs Old Tax | All You Need To Know | ITR Return

मार्च संपला:आता रिटर्न भरण्याची तयारी, पण जुनी की नवीन कर प्रणाली?, जाणून घ्या- ITR फाइलिंग संदर्भातील प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

31 मार्च संपले असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, लोक गतवर्षीचा आयटीआर भरण्याच्या तयारीत लागले आहेत. पण कोणती कर प्रणाली (टॅक्स स्लॅब) निवडावी. कोणती प्रणाली यूज केल्यास काय फायदा होईल, याबाबत बहुतांश लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कारण यावेळी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणाली लागू केली आहे. पण नवीन कर स्लॅब खरोखरच सर्व लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे का? चला तर यासंदर्भात लोकांना पडलेल्या प्रश्नांविषयी सविस्तर उत्तरे जाणून घेऊया...

प्रश्न : जुनी कर प्रणाली अद्याप कोणासाठी फायदेशीर आहे?
उत्तर : जर तुम्ही कर बचतीसाठी गुंतवणूक केली तर वजावटीचा फायदा घेऊन तुम्ही जुन्या कर प्रणालीतून अधिक पैसे वाचवू शकता. यासाठी गृहकर्ज, एनपीएस, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, मुदत ठेव, वैद्यकीय विमा असे पर्याय निवडावे लागतील. ज्यांना गुंतवणूक करायची नाही त्यांच्यासाठी नवीन कर स्लॅब चांगला आहे.

प्रश्न : नवीन कर प्रणाली प्रत्येकासाठी चांगली आहे का?
उत्तर : काही आयकर तज्ञांच्या मते, नवीन कर प्रणाली हा एक चांगला प्रयोगच म्हणता येईल. त्या मोठ्या लोकसंख्येसाठी नवीन कर स्लॅब हा एक उत्तम पर्याय आहे, ज्यांची कुठेही गुंतवणूक नाही. म्हणजेच, जर तुम्ही देखील कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसेल, तर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला कमी कर भरावा लागेल.

प्रश्न : वार्षिक वेतन 7 लाख असल्यास काय कराल?
उत्तर : नवीन कर प्रणालीत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कराची तरतूद नाही. जर तुम्हीही वार्षिक 7 लाख रुपये कमावत असाल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. जुन्या कर प्रणालीची निवड करताना, तुम्हाला कर भरावा लागेल किंवा कर बचतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. जुन्या कर प्रणालीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागत नव्हता. मात्र आता ही मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली आहे.

प्रश्न : 10 लाख रुपये वार्षिक पगार असलेल्यांसाठी कोणता पर्याय चांगला?
उत्तर : जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर नवीन कर स्लॅबनुसार 60 हजार रुपये आयकर भरावा लागेल. याशिवाय 4 टक्के सेसची तरतूद आहे. परंतु 10 लाख उत्पन्न असलेल्या एखाद्या व्यक्तीने जुना टॅक्स स्लॅब निवडला आणि सर्व आयकर सवलतींचा लाभ घेतला, तर केवळ जुना टॅक्स स्लॅब त्याच्यासाठी फायदेशीर करार असेल. कारण जुन्या कर स्लॅबमध्ये 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. याशिवाय गृहकर्जावर 2 लाखांची सूट, एनपीएसमध्ये गुंतवणूक करून अतिरिक्त 50 हजार रुपयांची सूट आणि वैद्यकीय विम्याचा प्रीमियम भरल्यास स्वत:चे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होऊ शकते.

प्रश्न: 10 लाख वार्षिक पगार असलेल्यांसाठी नवीन कर स्लॅब कसा चांगला?
उत्तर ः पूर्वी 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 22,500 रुपये कर आकारला जात होता, तो आता 15000 रुपयांवर आणला जाईल, म्हणजे 7500 रुपयांचा फायदा होईल. त्याचप्रमाणे, 6 ते 9 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आता पूर्वीच्या तुलनेत 15,000 रुपये, तर 9 ते 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना 25,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 ते 15 लाख रुपये आहे त्यांना 37,500 रुपये अधिक वाचतील. जर तुमचा पगार 10 लाख असेल आणि तुम्ही कुठेही गुंतवणूक करत नसाल तर नवीन टॅक्स स्लॅब तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

प्रश्न : जुनी टॅक्स प्रणाली निवडण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर : सरकारने स्पष्ट केले आहे की जुन्या कर स्लॅबचा पर्याय अजूनही लोकांना उपलब्ध असेल. मात्र, करदात्याला नवा टॅक्स स्लॅब नको असेल तर त्याला जुना टॅक्स स्लॅब निवडावा लागेल. आता पहिला पर्याय नवीन टॅक्स स्लॅब असेल, तर पर्याय असेल जुना टॅक्स स्लॅब.

प्रश्न : नवीन कर प्रणाली काय आहे
उत्तर : यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने नवीन कर स्लॅब आणला आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत, मूळ सूट मर्यादा आता 3 लाख रुपये करण्यात आली आहे. जी आधी अडीच लाख रुपये होती. आता 6 टॅक्स स्लॅब ऐवजी 5 टॅक्स स्लॅब असतील. नवीन कर प्रणालीमध्ये, 15.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 52,500 रुपयांची मानक कपात करण्यात आली आहे.

नवीन कर प्रणालीत करातील सूट व त्याची मर्यादा

  • 0 ते 3 लाख - 0 टक्के
  • 3 ते 6 लाख - 5 टक्के
  • 6 ते 9 लाखांवर - 10 टक्के
  • 9 ते 12 लाखांवर - 15 टक्के
  • 12 ते 15 लाखांवर - 20 टक्के
  • 15 लाखांपेक्षा जास्त रकमेवर - 30 टक्के

प्रश्न : जुनी कर प्रणाली म्हणजे काय?
उत्तर : जुन्या टॅक्स स्लॅबमधील 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कराची तरतूद आहे. मात्र सरकार यावर 12,500 ची सूट देते. यात सर्वात सोपे गणित असे आहे की, की जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्हाला 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नव्हता.

जुनी कर प्रणालीतील सूट व त्याची मर्यादा

  • 2.5 लाखांपर्यंत - 0%
  • 2.5 लाख ते 5 लाख - 5%
  • 5 लाख ते 10 लाख - 20%
  • 10 लाखाहून अधिक - 30%

हे ही वाचा सविस्तर

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी:जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर, त्याद्वारेही 10 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करता येते

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी 5 मोठ्या घोषणा केल्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नवीन कर प्रणाली फायदेशीर आहे की जुनी? तुमचा पगार वार्षिक 10 लाखांपर्यंत असेल व तुम्ही गुंतवणूक करण्यास तयार असाल, तर जुनी कर प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कसे, ते जाणून घेऊया.- येथे वाचा संपूर्ण बातमी

यंदा बजेटमध्ये करसवलत : 2 करप्रणाली कोणत्या; नवीन करप्रणालीत 'हे' बदल होताच सामान्यांना मिळणार दिलासा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प (वर्ष-2023-24) 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प मानला जात आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी केंद्रसरकार या अर्थसंकल्पात जनतेला अनेक सवलती देण्याचे संकेत वर्तविले जात आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी