आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Income Tax Return, Income Tax Refund, Finance Act 2021, Income Tax, Financial Year, Assessment Year, Income Tax Department News And Updates In Marathi

करदात्यांसाठी महत्वाची बातमी:आता उशीरा आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांना मिळणार केवळ एक संधी; नवीन नियम काय आहे ते जाणून घ्या

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इनकम टॅक्स रिटर्नशी जुळलेल्या नियमांमध्ये सरकारने मोठे बदल केले आहे
  • आता डिसेंबरपर्यंत शेवटच्या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरले जातील

जर आपण करदाते असाल तर या गोष्टी आपणाला समजून घेणे खूप गरजेचे आहे. भारत सरकारने आयकर विवरण पत्र भरण्याच्या नियमांमध्ये मोठे बदलाव केले आहे. यामध्ये आता उशीराने आयकर विवरण पत्र भरणाऱ्यांना केवळ एकच संधी दिली जाणार आहे. केंद्र सरकारने वित्त विधेयक 2021 च्या कायद्यात बदल करुन हे नियम आणले आहे. त्यामुळे ह्या नवीन नियमांची १ एप्रिल २०२१ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सध्या मिळतात दोन संधी
भारत देशात करदात्यांना उशीरा इनकम टॅक्स रिटर्न करण्यासाठी दोन संधी दिली जाते. मुल्यांकन वर्ष मार्च अखेरपर्यंत भरल्यास त्यावर कोणतीच फी भरावी लागत नाही. परंतु, पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत भरल्यास पाच हजार रुपये फीस भरावी लागते. जर यापेक्षा जास्त उशीर झाल्यास मार्चपर्यंत १० हजार रुपये फीस भरुन विवरण पत्र भरता येऊ शकते.

हे असतील नवे नियम
१ एप्रिलपासून करदात्यांना गेल्या वर्षीचा इनकम टॅक्स रिटर्न मार्च अखेरपर्यंत भरण्याची संधी आता मिळणार नाही. करदात्यांना फक्त पाच हजार उशीरा फी भरुन डिसेंबरपर्यंत विवरण पत्र भरता येणार आहे. यामध्ये दहा हजाराचा असणारा पर्याय सरकारने समाप्त केला आहे. परंतु, ज्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयापर्यंत आहे. अशा व्यक्तींना एक हजार रुपयाची उशीरा फी भरण्याचे पर्याय मात्र सुरु राहणार आहे.

पॅनसोबत आधार लिंक करण्यास विलंब झाल्यास भरावा लागेल दंड
नव्या नियमानुसार, पॅनसोबत आधार लिंक करण्याची तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत आहे. जर त्या आधी जोडणी केली नाही तर एक हजार दंडाचा प्रावधान केला आहे. या दंडाची तरतूद आयकर कायदा १९६१ मध्ये नवीन कलम २३४ एच मध्ये करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...