आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्सविषयी महत्त्वाचे:31 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरु शकला नाहीत तर टेंशन घेऊ नका! तुमच्याजवळ आहे अजून एक संधी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. परंतु असे अनेक लोक आहेत जे आयटीआर दाखल करू शकले नाहीत. तुम्ही अद्याप भरलेले नसेल तर लेट फीस भरण्यासह 31 मार्च 2022 पर्यंत ITR दाखल करू शकता.

लेट फीस किती द्यावी लागेल?
आयकर अधिनियमच्या कलम 139 (1) नुसार ठरलेल्या वेळपर्यंत ITR न भरल्यास कलम 234 अंतर्गत दंड आकारला जातो. बिलेटेड ITR 31 मार्च 2022 पर्यंत 5 हजार रुपयांच्या दंडासह भरला जाऊ शकतो.

जर करदाताचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपये किंवा यापेक्षा कमी असेल तर त्याला एक हजार रुपयेच दंड द्यावा लागेल. उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असल्यास विना दंडाचा रिटर्न भरता येऊ शकतो.

भरताना या 6 गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

  1. योग्य ITR फॉर्म निवडा
  2. इनकमची योग्य माहिती द्या
  3. सूट प्राप्त आणि कर मुक्त उत्पन्नाची चुकीची माहिती देऊ नका
  4. योग्य व्यक्तिगत माहिती द्या
  5. टॅक्स रिटर्नला व्हेरिफाय करा
  6. फॉर्म 26AS अवश्य डाउनलोड करा आणि आपले उत्पन्न त्याला जोडा

31 डिसेंबरपर्यंत रिटर्न न भरल्याने काय नुकसान आहे?
तुम्ही बिलेटेड ITR दाखल करून नोटीस टाळू शकता परंतु निर्धारित वेळेपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न न भरण्याचे अनेक तोटे आहेत. आयकरच्या नियमांनुसार निर्धारित वेळेपूर्वी ITR दाखल केल्यास तुम्ही आपले नुकसान पुढच्या आर्थिक वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करु शकता. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षात तुम्ही आपल्या कमाईवर टॅक्स दायित्व कमी करु शकता. मात्र आता ITR भरल्यास तुम्ही याचा फायदा घेऊ शकणार नाही.

अनेक प्रकारची इनकम टॅक्स सूटही तुम्हाला मिळत नाही. यामुळे आयकर कायद्याच्या कलम - 10A आणि कलम 10B अंतर्गत मिळणारी सूट मिळत नाही. तर कलम 80IA, 80IAB, 80IC, 80ID आणि 80IE अंतर्गत मिळणारी सूटही तुम्हाला मिळणार नाही.

या व्यतिरिक्त उसीराने इनकम टॅक्स रिटर्न फाइल केल्याने करदाता आणि आयकर कायद्याच्या कलम 80IAC, 80IBA, 80JJA, 80JJAA, 80LA, 80P, 80PA, 80QQB आणि 80RRB अंतर्गत मिळणाऱ्या डिडक्शनचा लाभही मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...