आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:जीसीसी राष्ट्रांसोबतच्या भारताच्या व्यापारात वाढ; 44 अब्जांची निर्यात

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीसीसी राष्ट्रांसाेबतच्या भारताच्या व्यापारात वेगाने वाढ झालेली आहे. सौदी अरेबिया आणि कतार यांसारख्या आखाती राष्ट्रांकडून भारत प्रामुख्याने कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करतो आणि मोती, मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान खडे,धातू,दागिने, विद्युत यंत्रसामग्री, लोखंड, पाेलाद आणि रासायनांची या देशांना निर्यात करताे.

२०२०-२१ दरम्यान, भारताने सहा जीसीसी (गल्फ कोऑपरेशन कौन्सिल) राष्ट्रांकडून ११०.७३ अब्ज डाॅलरकिमतीच्या वस्तू आयात केल्या. या देशांना भारताची व्यापारी निर्यात ४४ अब्ज डॉलर इतकी होती. व्यापाराव्यतिरिक्त, आखाती राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकसंख्या आहे. सुमारे ३२ दशलक्ष अनिवासी भारतीयांपैकी (एनआरआय) निम्मे लोक आखाती देशांमध्ये काम करत असल्याचा अंदाज आहे.हे अनिवासी भारतीय मायदेशी मोठी रक्कम पाठवतात. जागतिक बँकेच्या नोव्हेंबर २०२१ च्या अहवालानुसार २०२१ मध्ये भारताला परदेशातून ८७ अब्ज डाॅलर इतकी रक्कम हस्तांतरीत झाली यातील मोठा हिस्सा जीसीसी राष्ट्रांचा आहे.

सौदी अरेबिया गेल्या आर्थिक वर्षात चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देशा हाेता. एकूण द्विपक्षीय व्यापार २०२१-२२ मध्ये सुमारे ४३ अब्ज डाॅलर इतका वाढला आहे जो मागील आर्थिक वर्षात २२ अब्ज डाॅलर हाेता. भारत कतारमधून दरवर्षी ८.५ दशलक्ष टन एलएनजी आयात करतो आणि तृणधान्यांपासून ते मांस, मासे, रसायने आणि प्लास्टिक या उत्पादनांची निर्यात करतो. भारत आणि कतार यांच्यातील द्वि-मार्गी व्यापार २०२०-२१ मध्ये ९.२१ अब्ज डाॅलरवरून २०२१-२२ मध्ये १५ अब्ज डाॅलर झाला. कुवेत हा गेल्या आर्थिक वर्षात भारताचा २७ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. द्विपक्षीय व्यापार मागील आर्थिक वर्षातील ६.३ अब्ज डाॅलरच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये १२.३ अब्ज डाॅलरवर गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...