आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धनत्रयोदशीच्या दोन दिवस आधी सोन्याच्या किमतीत घट आल्याने दागिने खरेदीची योजना आखणाऱ्या लोकांमध्ये उत्साह संचारला. सराफा बाजारांत मंगळवारी अचानक गर्दी पाहायला मिळाली. मात्र, सोन्याचा भाव ५० हजार रु. प्रति दहा ग्रॅमच्या आसपास झाल्याने या वर्षी लाइटवेट आणि सुपरलाइट वेट ज्वेलरीची मागणी जास्त आहे. सोमवारी कोरोना लस तयार झाल्याच्या दाव्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. याचा परिणाम मंगळवारी देशातील सराफा बाजारांत सोन्याचे भाव दोन हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत घसरल्याचे दिसले.
गेल्या वर्षी धनत्रयोदशीबाबत बोलायचे झाल्यास तेव्हा सोने ३८,३०० रु. प्रति दहा ग्रॅम होते. सध्याचा भाव ५० हजार रु. प्रति दहा ग्रॅम आहे. भाव वाढल्याने खरेदीचा ट्रेंड बदलला आहे. रतलाम स्थित डीपी ज्वेलर्सचे अनिल कटारिया म्हणाले, सोन्याचा भाव जास्त असल्याने लाइट ज्वेलरीची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, रतलामचे सोने शुद्धतेच्या बाबतीत संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हॉलमार्क सोन्याची शुद्धता ९१.६ टक्के असते तर रतलामच्या सोन्याची शुद्धता ९२ टक्के असते.
जळगाव येथील बाफना ज्वेर्लर्स प्रोपरायटर सुशील बाफना म्हणाले, धनत्रयोदशीच्या दोन दिवस आधी सोन्याचा भाव पडल्याने खरेदी वाढली आहे. लाइटवेट ज्वेलरी आणि सुपरलाइटवेट ज्वेलरीची मागणी आहे. इटॅलियन ज्वेलरी ज्यात कानाचे टॉप्स, लॉकेट, मंगळसूत्र आदी येतात त्यांची विक्री जास्त होत आहे.
जयपूरमध्ये लग्नसराई आणि गुंतवणुकीतील मागणी पाहता दागिन्याच्या तुलनेत सोन्या-चांदीची नाणी आणि भांड्याची मागणी जास्त आहे. एकूण खरेदीत ७० टक्के खरेदी नाण्यांची होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.