आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो दरात वाढ:30 लाखांच्या कर्जावर 7 महिन्यांत 18% वाढला ईएमआय

मुंबई/नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईला आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिझर्व्ह बँकेने बुधवारी पुन्हा रेपो दरामध्ये ०.३५% वाढ करून तो ६.२५% केला. मे महिन्यापासून आतापर्यंत ही सलग पाचवी वाढ असून ऑगस्ट २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे. यामुळे रेपो दर ४% वाढून ६.२५ % वर गेला आहे. यानुसार गृह कर्जाच्या व्याजदरात २.२५ टक्के वाढ झाली आहे. दरमहा हप्ता (ईएमआय) १८ टक्के वाढला आहे. या पतधोरणाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. रिझर्व्ह बँकेचे आक्रमक धोोरण पाहता अर्थतज्ज्ञांच्या मते ०.२५ टक्क्यांची आणखी एक वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास रेपो दरात वाढ होऊन तो ६.५० टक्के ते ६.७५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

पुढील पतधोरण आढावा बैठक फेब्रुवारीत
सुविधा : रिझर्व्ह बँकेन दोन नवीन सुविधांचीही घोषणा केली आहे. त्यापैकी एक म्हणजे रि-केवायसीसाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत फेऱ्या मारण्याची गरज नाही. दुसऱ्यांदा केवायसी ऑनलाइनही करता येईल. तर दुसरी सुविधा म्हणजे शेअर बाजारातील आयपीओसाठी ज्याप्रमाणे बँक खात्यात रक्कम ब्लाॅक करुन ठेवता येते तशीच सुविधा इतर युपीआय पेमेंटमध्येही प्राप्त होणार आहे. उदा. हॉटेलची बुकींग. परंतु शाळांची फीस, कर भरणा अथवा घरभाडे भरण्यासाठी ठराविक रक्कम ब्लॉक करता येणार नाही.
एफडीचे व्याज दरही वाढेल, सर्वांना ८ % पर्यंत परतावा मिळू शकेल : आता मुदत ठेवीवरील ( एफडी) व्याज दरही वाढण्याची शक्यता आहे. आता हा फायदा सर्वच थरातील ग्राहकांना मिळेल.

विद्यमान व्याज दर स्थिती
बँकसर्वाधिक दर*
यूनिटी स्मॉल फायनान्स बँक8.50%
सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक8.01%
एचडीएफसी बँक6.50%
आयसीआयसीआय बँक6.50%
स्टेट बँक ऑफ इंडिया6.25%
*विविध मुदतींसाठी

एक्स्पर्ट
आदिल शेट्‌टी, सीईओ, बँक बाजार

दरवर्षी ५ टक्के रक्कम आगाऊ भरा,
२० वर्षांचे कर्ज १२ वर्षांत फिटेल

1. कर्जाचे व्यवस्थापन कसे करू ? गृह कर्जावरील व्याज गेल्या सहा महिन्यांत बरेच वाढले आहे. कर्जाचा कालावधीही वाढला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला हे करणे शक्य आहे. कर्जाचा दर आपल्या क्रेडिट प्रोफाइल अथवा बाजारातील दरांपेक्षा जास्त आहे अथवा कमी हे पहा. ५० पॉइंट अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास कर्ज पुन्हा घेऊ शकता. (रि -फायनान्स) व्याजदर घटवणार का हे बँकेला विचारून पाहा. अन्य बँकेत कमी व्याज दरावर कर्ज मिळणार असेल तर ते ट्रान्सफर करता येते. प्रोसेसिंग,लीगल फीस, एमओडी चार्ज मिळून काही पैसे माेजावे लागतील परंतु व्याजात मोठी बचत होईल. { केवळ प्री पेमेंट ( आगाऊ भरणा) करा. २० वर्षांच्या कर्जावर प्रत्येक वर्षीच्या बॅलन्समधील ५ टक्के रकमेचा आगाऊ भरणा केल्यास ते कर्ज १२ वर्षांत फिटू शकते. {केवळ एक अतिरिक्त ईएमआय भरल्यास २० वर्षांचे कर्ज सुमारे १७ वर्षांत फेडले जाऊ शकते.

2. पूर्ण कर्ज एकरकमी चुकवले तर ? व्याज दर अधिक असल्यास पूर्ण कर्ज एकमुस्त रक्कम भरून फेडले जाऊ शकते. त्याचा फायदा म्हणजे आर्थिक तंगी आणि त्यापाठोपाठ येणार तणाव कमी होईल. अर्थात बचत केलेला पैसा आपल्याजवळ राहणार नाही. 3. नवे कर्ज घेऊ का ? व्याज दरात चढ-उतार सुरुच असतो. आपली घर घेण्याची तयारी आहे का हे सर्वात महत्वाचे. आपल्याकडे चांगली बचत आहे आणि कर्जासाठी पात्र असाल तर नि:शंकपणे कर्ज घ्या. आज ‌व्याज दर अधिक असला तरी कदाचित पुढील वर्षी तो घटू शकेल.

व्याजदर २.२५ % वाढल्याने आपल्या कर्ज हप्त्यात असा पडला फरक मे महिन्यानंतर ईएमआय २.२५ % वाढला, म्हणजे ६.५ % वरून ८.७५ % झाला. ३० लाखांच्या गृह कर्जावरील हा तक्ता {मूळ कर्ज : व्याजदर ६.५ % असेल तर २४० महिन्यांसाठी एकूण व्याज २३,६८,१२७ रुपये फेडावे लागेल. ईएमआय २२,३६७ रुपये भरावा लागेल. {दर अन् कालावधी दोन्हीत वाढ : व्याजदर ८.७५ % आणि कालावधी ३६० महिने झाल्यास व्याज ५४,९६,३६० लागेल. ईएमआय वाढून २३,६१० रु. होईल. {दरवाढ, कालावधी तोच : व्याजदर वाढून ८.७५ % झाला व कालावधी २४० महिनेच राहिल्यास एकूण व्याज ३३,६२,७३० भरावे लागेल. ईएमआय २६,५२० होईल.

महागाईचा वाईट काळ संपला : गव्हर्नर शक्तिकांत दास : पतधोरण ठरवताना रिझर्व्ह बँक किरकोळ महागाईचा दर विचारात घेत असते. हा गेल्या ११ महिन्यांपासून समाधानकारक स्थितीपेक्षा अधिक आहे. ऑक्टोबर महिन्यात हा ६.७ टक्के राहिला. सरकारने तो ४ टक्के ठेवण्यास सांगितले आहे. भारताची आर्थिक स्थिती भक्कम आहे. महागाईचा वाईट काळ संपुष्टात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी चलनवाढीचा दर ६.७ टक्के राहील, असा बँकेचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...