आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या विक्रीत चांगलीच उसळी:एसयूव्ही कंपन्यांच्या विक्रीत वाढ; बाकीच्यांमध्ये घट

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील छोट्या कारच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे, तर युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) विभागातील कारच्या विक्रीत चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. हाच कल एप्रिलमध्ये वाहनांच्या विक्रीत पुन्हा एकदा दिसून आला. लहान कारमधील अग्रणी मारुती सुझुकी आणि ह्युंदाई यांनी विक्रीत घट नोंदवली, तर एसयूव्हीकेंद्रित टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा आणि किया मोटर्सच्या विक्रीत वाढ झाली.देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी अधिक लहान कार बनवते. मारुतीची देशांतर्गत विक्री एप्रिलमध्ये १०% घसरून १,२१,९९५ वर आली आहे. ह्युंदाईने १०% घट नाेंदवताना ४४,००१ कारची विक्री केली. दुसरीकडे, एसयूव्हीकेंद्रित टाटा मोटर्सने एप्रिलमध्ये ४१,५८७ कार विकल्या.

गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यात ६६% वाढ झाली आहे.महिंद्राने एप्रिलमध्ये केवळ ३५८ लहान कार विकल्या, तर एसयूव्ही विक्रीचा आकडा २२,१६८ होता. त्यात वार्षिक आधारावर २२% ची वाढ दिसून आली. कंपनीचे ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “आमची एसयूव्ही सेगमेंटमधील विक्री सातत्याने वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...