आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Increase tariffs on chinese goods 1 lakh crore will be saved 17000 crore will be saved if api is created

चीनकडून आर्थिक फटका बसतोय :चिनी वस्तूंवर शुल्क वाढवावे; 1 लाख कोटींची बचत होईल, ‘एपीआय’ची निर्मिती केल्यास 17 हजार कोटी रुपये वाचतील

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने व्यवसायासोबत देशाच्या सार्वभौमत्वालाही ठेच पोहोचवली आहे. आपण सामान्यजन सीमेवर लढाई करण्यास जात नाही, मात्र आपण त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकून देशासाठी खूप काही करू शकतो. आपण हा विचार करण्याची गरज आहे की, भारतात सर्व प्रकारची उत्पादने तयार होत आहेत तरीही आयात केली जावी? लक्ष्मीची मूर्ती चीनची का खरेदी केली जावी? सरकारने चिनी उत्पादनावर शुल्क वाढवले पाहिजे. कारण, चीन आपल्या सामग्रीची डंपिंग करत आहे. त्यामुळे डब्ल्यूटीओच्या अटीही आपल्यावर लागू होणार नाहीत. यामुळे काही अवधीसाठी काही उत्पादने महाग होतील, मात्र देशात मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग झाल्यास ते स्वस्तही होतील. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कॅट)ने दुकानदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी चिनी मालाची ऑर्डर करू नये. कॅट ५०० पेक्षा जास्त श्रेणीच्या ३००० चिनी उत्पादनांची बहिष्काराची यादी जारी केली आहे. या यादीत एफएमसीजी उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक्स, टेक्सटाइल्स, बिल्डर हॉर्डवेअर, पादत्राणे, किचन वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, घड्याळे, रत्न व दागिने, स्टेशनरी, कापड, कागद आदी आहेत. या चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यास भारताचा आयात तोटा कमी होईल. आमच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत यामुळे जवळपास १ लाख कोटी रुपयांच्या आयात तोट्याची बचत होईल. याशिवाय सरकारला चायनीज फंडिंगचे स्टार्टअप उदा. पेटीएम, बिग बास्केट आदीवरही कडक निगराणी हवी. नुकतेच पीपल्स बँक ऑफ चायना(पीबीओसी)ने एचडीएफसीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे हेही सरकारने पाहिले पाहिजे.
प्रवीण खंडेलवाल, सरचिटणीस, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स


आपण १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत एपीआयमध्ये स्वावलंबी होतो. अवलंबण्यातून तयार होणारे प्रतिजैविक पेनिसिलिनसह सर्व एपीआय (सक्रिय औषधनिर्माण घटक) भारतात तयार होत होते. भारत अँटिबायोटिक्स, टॉरेंट, जेके फार्मा, स्पिक, अॅलेंबिकसह अनेक मोठ्या कंपन्या याचे उत्पादन करत होत्या. उदारीकरणानंतर हळूहळू चीनने एपीआयच्या बाजारावर कब्जा केला आहे. चीनने बाजारात प्रवेश केल्यावर एपीआयला त्या किमतीत विकायला सुरुवात केली, ज्या किमतीवर चीन आपल्या देशातही कधी एपीआय विकत नव्हता. भारतीय एपीआयच्या तुलनेत चीनचा एपीआय सुमारे ४० टक्के स्वस्त पडत होता. याच पद्धतीने भारतीय एपीआय उत्पादक स्पर्धेबाहेर झाले. सर्व कंपन्यांनी पेनिसिलिनचे उत्पादन बंद केले. सध्या पेनिसिलिनसह सर्व प्रकारच्या अँटिबायोटिक्स व एपीआयसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. केवळ एपीआय नव्हे तर भारताने एपीआयच्या निर्मितीसाठी उपयोग केल्या जाणाऱ्या सामग्रीचे उत्पादनही बंद केले, ज्यांना मध्यस्थ म्हटले जाते. आता दरवर्षी जवळपास १७ हजार कोटींचे एपीआय आणि अँटिबायोटिक्स चीनहून आयात केले जातात. दुसरीकडे, आपल्याकडे एपीआय मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, ज्यांचा मोठा वाटा विनाकामाचा राहतो. कारण, त्यांच्याकडे मागणी नसते. डोकलाम वादावेळीही भारतीय औषध कंपन्यांना एपीआयच्या पुरवठ्याची समस्या आली होती. भारत सरकारला भारतीय एपीआय मॅन्युफॅक्चररला प्रोत्साहित करावे लागेल की, ५३ मॉलिक्यूल तुम्हाला तयार करायचे आहेत. याच्याशी जागतिक स्तरावर स्पर्धा होण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे आणि विविध अडचणी संपवल्या जातील.
चीनने आपल्याशी सीमेवरच नव्हे, आर्थिक आघाडीवरही युद्ध आरंभले आहे. आपल्या स्वस्त सामग्रीची डंपिंग करून तो आपल्या व्यावसायिकांना बाजाराबाहेर काढत आहे. तज्ञांकडून समजून घेऊ चीन कसा आपल्या व्यवसायाला नुकसान पोहोचवत आहे व काय करण्याची आवश्यकता आहे.
अशोक मदान, कार्यकारी संचालक, इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

0