आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Increased Demand For Credit, Lower NPAs, Improved Health Of Banks; Retail Debt Rises To 12.4 Per Cent From 10.7% In The Quarter

दिव्य मराठी विश्लेषण:कर्जाच्या मागणीत वाढ, एनपीए कमी, बँकांचे आरोग्य सुधारले; किरकोळ कर्जाची वाढ, तिमाहीत 10.7 % वरून 12.4 टक्क्यांवर

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड महामारीनंतर व्यावसायिक घडामाेडीत पुन्हा वाढ झाल्याने आणि बाजार खुलण्याबरोबरच लोकांनी कर्ज घेऊन बराच खर्च केला. यामुळे मागणी वाढली आणि अर्थव्यवस्थेने गमावलेली गती परत मिळवली. कमी व्याजदरामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात देशातील पतवृद्धीत वेगाने वाढ झाली आहे.

संशोधन फर्म केअरएजकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये किरकोळ (वैयक्तिक) कर्जाची वाढ वार्षिक १०.७% वरून मार्चमध्ये १२.४% वर गेली आहे. या कालावधीत अन्नेतर पत वाढ दुपटीने वाढली आहे. मार्च २०२१ मध्ये या विभागाची पतवाढ ४.५% होती, ती मार्च २०२२ मध्ये ९.७% पर्यंत वाढली. यामुळे बँकिंग क्षेत्राची पतवाढ दुपटीने वाढून ९.६% झाली आहे. परिणामी बँकांची कामगिरी सुधारली. मार्चमध्ये बँकांच्या नफ्यात वार्षिक ८० % आणि खासगी बँकांच्या नफ्यात ८७ टक्क्यांनी वाढ झाली. मार्चमध्येच नाही तर जानेवारी-मार्च तिमाहीतही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा ८६.५% ने वाढून १८,०८८ कोटी रुपयांवर पोहोचला. या काळात खासगी बँकांचा नफा ९०% वाढून ३०,४३९ कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.

बँकांच्या नफ्यात दोन वर्षांत सुधारणा
कालावधी सरकारी बँक खासगी बँक

चौथी तिमाही -२० -८,००० ५,०००
चौथी तिमाही-२१ १०,००० १६,०००
चौथी तिमाही-२२ १८,०८८ ३०,४३९
(आकडे हजार कोटी रुपयांमध्ये)

दोन वर्षांत बँकांचा एनपीए कमी झाला
कालावधी सरकारी बँक खासगी बँक

चौथी तिमाही-२० १० ८.% ७.३%
चौथी तिमाही-२१ ९.११% ५.१%
चौथी तिमाही-२२ ७.३% ४.१%

एका वर्षात बँकांचा पतपुरवठा निम्म्यावर
सर्व शेड्युल्ड बँकांचा पतखर्च मार्च तिमाहीत ०.७% पर्यंत घसरला. २०२१ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत १.४% आणि मार्च २०२ च्या तिमाहीत २.० %. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा पतखर्च १.३% वरून ०.९% वर आला. खासगी बँकांच्या पतखर्चातही १.७% ते ०.५% घट झाली.

बातम्या आणखी आहेत...