आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Increased Investment Of Wealthy Indians In Dubai After The Epidemic, Big Property Purchases; News And Live Updates

नवा ट्रेंड:महामारीनंतर भारतीय श्रीमंतांची दुबईत गुंतवणूक वाढ, मालमत्तेत मोठी खरेदी; दुबईच्या स्थानिक खरेदीदारांनंतर मालमत्तेत सर्वाधिक गुंतवणूक भारतीयांची

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • भारतीयांकडून दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा आकडा पीकवर पोहोचला

कोरोना महामारीनंतर भारतीय श्रीमंत दुबईत मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक करत आहेत. भारतीयांच्या दुबईतील गुंतवणुकीचा आकडा आपल्या पीकवर पोहोचला आहे. भारतापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावरील जगातील सर्वात चांगले रेंटल आणि जागतिक दर्जाची जीवनशैली भारतीय श्रीमंतांना दुबईत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करत आहे. मालमत्ता कन्सल्टंट फर्म एनारॉकनुसार, २०१९ मध्ये भारतीयांनी दुबईच्या रिटेल इस्टेटमध्ये जवळपास ८ अब्ज दिरहम म्हणजे, १६ हजार कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक केली होती.

ही संख्या कोरोना महामारीनंतर आणखी वाढली आहे. दुबईत भारतीयांकडे जवळपास संयुक्त अरब अमिरातीच्या स्थानिक लोकांसमान संपत्ती खरेदी करत आहेत. जानेवारीत दुबईत एकूण ३३०० मालमत्तांची विक्री झाली. ही जानेवारी २०२० पेक्षा ३७% जास्त आहे. एप्रिलमध्ये येथे ४६४३ मालमत्तांचा सौदा झाला, जो मार्च २०१७ नंतर सर्वाधिक आहे. यामध्ये यूएई नागरिकांनंतर सर्वात अधिक भारतीयांनी केला. यूएई नागरिकांनंतर सर्वात जास्त खरेदी भारतीयांद्वारे केली. आखाती देशांत एनारॉकचे सीईओ जेकब म्हणाले, दुबई जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये समाविष्ट आहे.

पाम जुमेरा, डाऊनटाऊन व मरिनामध्ये जास्त गुंतवणूक

 • महामारीनंतर भारतीय लोक दुबईच्या अशा भागांमध्ये जास्त गुंतवणूक करत आहेत जिथे भारतीय राहणीमानाशी जास्त मिळतेजुळते आहे.
 • बहुतांश भारतीय २० कोटी रु. वा त्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध पर्यायांत रस दाखवत आहेत. भारतीयांनी चांगल्या रिटर्नसाठी जुमेरा व्हिलेज सर्कल, जुमेरा लेक टॉवर्स, मेडान आणि दुबई हिल्स इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.

कारणे पाहा : यामुळे वाढला दुबईतील रिअल इस्टेटमध्ये रस

 • दुबईत रहिवासी परवाना प्राप्त करण्याची सर्वात वेगवान आणि सोपी पद्धती संपत्ती खरेदी करणे आहे.
 • दुबईत रेंटल यील्ड ६ ते १०% आहे, हे जगातील कोणत्याही शहराच्या तुलनेत जास्त आहे.
 • दुबईत आता विदेशी स्थानिक भागीदाराशिवाय व्यवसायात १००% मालकी ठेवू शकतो.
 • मुंबई, शांघाय, लंडन व सिंगापूर
बातम्या आणखी आहेत...